बारामती : कामगार नामाचे समन्वयक ॲड.संजय नाळे यांची विधी व न्याय मंत्रालय तर्फे मे.नोटरी सो (भारत सरकार) पदी निवड करण्यात आली.
सन २०११ पासून ॲड.संजय नाळे हे बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालया मध्ये वकील म्हणून काम करत आहे. त्या बरोबरच समजा मध्ये समता ,न्याय,बंधुता जनमाणसात रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मोफत कायदा सल्ला केंद्र चालवत असून त्याच्या माध्यमातून शेतकरी, महिला,कामगार व इतर गरजूंना मोफत कायदा सल्ला देत असून त्या माध्यमातून सेवा देत आहे. व त्यातून सर्वसामान्य गरजू पर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचविण्याचा प्रामाणिक आणि कायदेविषयक मूल्य पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.
तसेच कामगार नामा च्या माध्यमातून "कामगार न्याय जगत" या सदरा मध्ये कामगार कायद्या विषयी जनजागृती करीत असून या पुढे अश्या प्रकारचे काम अजून प्रभाव पणे करणेसाठी नोटरी या पदाचा नक्कीच फायदा होणार आहे. .