आज मुंबई येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांच्यावतीने 'राज्यस्तरीय कामगार मेळावा'

मुंबई : राज्यभरातील कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवणारे, तसेच त्यांच्या अधिकार आणि हक्काची सुरक्षा करणारे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आज (ता. २) प्रभादेवी येथील हुतात्मा बाबू गेणू गिरणी कामगार क्रीडा भवन येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. राज्यभरातील कामगार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली असे वृत्त सकाळ वृत्तसेवा यांनी दिली आहे.

    मेळाव्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश येथून कामगार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कामगार कल्याण मंडळामध्ये कार्यरत पूर्णवेळ व अर्धवेळ कर्मचारी यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा होईल. सध्या अनेक वादग्रस्त, कामगार हितविरोधी कायदे पारित केले जात आहेत. तसेच दोन वर्षांपासून मंडळ प्रशासकांकडून चालवले जात आहेत, याअनुषंगाने 'कामगार चळवळीची दशा आणि दिशा' यावा विचारमंथन होणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

आरे डेअरीवर प्रस्ताव 

वरळीच्या आरे दुग्धालयाच्या प्रश्‍नावर मोठे जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय दूध उत्पादक आरे डेअरीचा खासगी दूध कंपन्यांच्या हितासाठी बळी दिला जात आहे. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अवहेलना सध्या सुरू आहे, असा आरोप यशवंत भोसले यांनी केला.