चाकण : येथील औदयोगिक वसाहतीमधील स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि.(SKODA Auto Volkswagen India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि स्कोडा फोक्सवॅगन एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये दिनांक 20 मे 2023 रोजी पाचवा वेतनकरार संपन्न झाला आहे.
कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे :
कराराचा कालावधी : सदर करार तीन वर्षांसाठी असुन कराराचा कालावधी दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत असेल.
पहिल्या वर्षी - 70% रक्कम एकूण 12,600 रु.
दुसऱ्या वर्षी - 15% रक्कम एकूण 2,700 रू.
तिसऱ्या वर्षी - 15% रक्कम एकूण 2,700 रू.
इतर फायदे - एकूण 1,856 रू.
एकूण पगार : सदर पगारवाढ झाल्यानंतर कायमस्वरूपी कामगारांचा एकूण पगार कमीत कमी 42,853 रू . व जास्तीत जास्त पगार 94,326 रू. झालेला आहे. सदर पगारवाढीचा फायदा संघटनेच्या एकूण 1,968 कायमस्वरूपी कामगारांना झालेला आहे.
फरक : दिनांक 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंतचा 100% फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
दिवाळी बोनस : सध्या मिळणारा दिवाळी बोनस 42,000 रू आहे. त्यामध्ये दरमहा 1,000 रू नी वाढ करून एकूण 54,000 रू . दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच जर बोनस कायदा लागू झाला तर जी रक्कम जास्त असेल ती रक्कम दिवाळी वोनस म्हणून देण्यात येईल.
मेडिकल बफर पॉलिसी : वैदयकीय सुविधेमध्ये बफरची रक्कम 30 लाखांवरून 50 लाख रूपये करण्यात आली आहे.
1 .या निधी साठी सर्व टिम मेंबर्सचे मिळून 20 लाख रू जमा करण्यात येतील आणि व्यवस्थापनाकडून एकरकमी 20 लाख रू देण्यात येतील. असे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांस एकूण 40 लाख रू देण्यात येतील .
2. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांस पुढिल 6 महिने संपूर्ण पगार चालू राहिल.
3 . मृत व्यक्तीच्या 2 मुलांच्या 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 1 लाख रू. प्रत्येक वर्षी एकरकमी कंपनीकडून देण्यात येतील .
पर्सनल अॅक्सिडेंट योजना : एखादया टिम मेंबरचा कंपनीत किंवा कंपनी बाहेर वैयक्तिक अपघात झाल्यास एका आठवड्याला 10,000 रू अलाऊंस मिळत होता. त्यामध्ये वाढ करून तो अलाऊंस एका आठवडयाला 15,000 रू करण्यात आला आहे. (म्हणजेच एका महिन्याला 60,000 रू अलाऊंस मिळेल)
Veriable Pay Scheme : सध्या चालू असलेल्या Veriable Pay ची रक्कम 13,000 वरून कमी करून 10,000 रू करण्यात आला आहे व कमी केलेली 3,000 रू. रक्कम फिक्स पगारामध्ये टाकण्यात आली आहे.
1. EL रजांमध्ये 2 सुट्टयांनी वाढ करण्यात आली आहे.
2. EL रजा घेण्याचे टप्पे 6 वरून 7 करण्यात आले आहेत.
3. EL रजांची साठवणूक 60 वरून 70 करण्यात आली आहे.
Death Leave : टिम मेंबरच्या कुटुंबियापैकी (मेडीकल कार्डधारक) कोणाचा मृत्यु झाल्यास 2 दिवसांची रजा देण्यात येईल.
Maintenance Allowance : सध्या Maintenance साठी एकूण पगारा व्यतिरीक्त दरमहा मिळणारा 5,000 रू. Compensatory Allowance आहे असाच पुढेही चालू ठेवण्यात येईल.
सदर वेतनकरारावर व्यवस्थापना कडून पियुष अरोरा (मॅनेजिंग डायरेक्टर), मोईमोर हाईक (प्रॉडक्शन डायरेक्टर), सरमा चिलारा (एच आर डायरेक्टर), अमित मदान, रामहरी कुटे, अमित राणे, केदार आपटीकर, अविनाश गोसावी, मन्चिकांती नागा, वैभव कुलकर्णी, गौरव जैन व रोहन गुप्ते यांच्यावतीने तसेच संघटनेकडून अमृत दरेकर (अध्यक्ष), प्रविण हंबीर ( जनरल सेकेटरी), महादेव चव्हाण (खजिनदार), उमेश लांडगे (उपाध्यक्ष), शरद होळकर (उपाध्यक्ष), योगेश थोरात (सह सेकेटरी), अभिषेक घाटगे (सह सेकेटरी), गणेश कुमठेकर (सदस्य), दिपक चौधरी (सदस्य) व श्रीकांत पवार (सदस्य) यांच्यावतीने स्वाक्षरी करण्यात आली.
तसेच वेतनकरार यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी आंतरराष्ट्रिय पातळीवरून Mr. Jaroslav Povsik (Chairman-KOVO Trade Union, Czech Republic) आणि श्रमिक एकता महासंघाकडून मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. सदर वेतनकराराचे जागतिक स्तरावरील संघटनांकडून तसेच आजूबाजूच्या सर्व MIDC मधील संघटनांकडून कौतुक केले जात आहे.