नाशिक : नाशिक औद्योगिक वसाहाती मधील सातपूर येथील इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट इंडिया प्रा.लि. (International Automotive Component India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये दिनांक १०/०४/२०२३ रोजी हॉटेल कलासागर, कासारवाडी, नाशिकफाटा, येथे झालेल्या पहिल्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै. महेश लांडगे, पै. रोहिदास गाडे, व अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कोपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे :
कराराचा कालावधी : दि.०१/०१/२०२३ ते ३१/१२/२०२५ या तीन वर्षांचा राहील.
प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ५ महिन्याचा फरक एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येणार आहे.
कायम नोकरी : ४० कंत्राटी कामगारांना कंपनी रोलवर घेऊन कायम नोकरी देण्याचे ठरले आहे. तसेच उर्वरीत कामगारांना पुढील करारामध्ये कायम करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.
मेडिक्लेम पॉलीसी : कुटुंबातील एका व्यक्तीस ३,००,०००/- रुपये या प्रमाणे चार व्यक्तींसाठी १२,००,०००/- रुपयांची पॉलिसी राहणार संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी आणि मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे.
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व जादाचा मोबदला पुढील पॉलिसी प्रमाणे कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.
ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : मासिक ग्रॉस पगाराच्या ७२ पट एवढी रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.
टर्म इन्शुरन्स पॉलीसी : जर एखाद्या कामगाराचा कंपनीमध्ये किंवा कंपनी बाहेर नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या वारसास वार्षिक ग्रॉस पेमेंटच्या ४ (चार) पट एवढी रक्कम मिळेल.
मतदानाची सुट्टी : सरकारी आदेशानुसार राहील,
दिवाळी बोनस : सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा पगाराच्या २०% या प्रमाणे देण्यात येईल.
मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १०००/- ( हजार ) रुपये देण्यात येईल.
पगाराची उचल : पगाराची उचल म्हणून प्रत्येक कामगारास ३०,०००/- (तीस हजार ) रुपये देण्याचे मान्य, परत फेड ही पुढील समान तीन महिन्यांत करण्याचे ठरले.
वार्षिक स्नेह संमेलन : सर्व कामगारांचे सहकुटुंब वार्षिक स्नेहसंमेलन प्रत्येक वर्षी सुधारीत पद्धतीने घेण्याचे ठरले आहे.
ड्रेस : पूर्ण ड्रेस - २, उच्च प्रतीचा शूज - १ जोड.
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. महेश लांडगे, प्रमुख सल्लागार पै. रोहिदास गाडे , संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, प्रशांतआप्पा पाडेकर, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, दत्तात्रय गवारे, दत्ता येळवंडे, कुणाल कोळेकर, पिंगळे, युनिट प्रतिनिधी विष्णू रासकर, बाबुराव पोते, हेमंत हिरे, दत्तात्रय कांदळकर, शुभम एरंडे, कमलेश पाटील, प्रमोद लोहार, जगन लांडगे तसेच व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कोपरकर, एच. आर. डायरेक्ट इंडिया हेड दिपाली खैरनार, प्लॅन्ट हेड. दिप्तीरंजन नायक नाशिक, डी. जी.एम, एच आर अनिकेत निळेकर, रिजनल मॅनेजर आय. आर अनिल कुंभार, एच.आर.असि. मॅनेजर श्रीकांत पाटील नाशिक यांनी सह्या केल्या.
संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. महेश लांडगे, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कोपरकर, अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले व कंपनी एच. आर. डायरेक्टर इंडिया हेड दीपाली खैरनार यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आय. आर अनिल कुंभार यांनी केले, तसेच सूत्रसंचालन सौ. पुजाताई थिगळे यांनी केले, व खजिनदार अमृत चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारांनी डिजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला.
