बजाज ऑटो (Bajaj Auto) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : चाकण येथील बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनी व्यवस्थापन आणि विश्वकल्याण कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी शांततामय, उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे :

करार कालावधी : कराराचा कालावधी साडेतीन वर्ष (42 महिने) असेल. [ दि.1जानेवारी 2023 पासून ते दि.30 जून 2026 पर्यंत ] 

प्रत्यक्ष पगार वाढ : 
15 वर्षावरील कामगारांना CTC Rs.15000/- 

प्रथम वर्ष : रु.9500 /- 
दुसरे वर्ष : रु.2250 /-
तिसरे वर्ष : रु.3250 /-

12 ते 14 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना CTC Rs.14700/- 
प्रथम वर्ष : रु.9200 /- 
दुसरे वर्ष : रु.2250 /-
तिसरे वर्ष : रु.3250 /-

11वर्ष आणि त्याखालील  कामगारांना CTC Rs.14350/- 
प्रथम वर्ष : रु.8850 /- 
दुसरे वर्ष : रु.2250 /-
तिसरे वर्ष : रु.3250 /-

Attendance Reward : महिन्यामध्ये संपूर्ण दिवस हजर असल्यावर वर मिळणारा  Attendance Reward रक्कम सर्वांसाठी कोणत्याही अटीशिवाय Rs.600 ( सहाशे रुपये ) प्रति महिना निश्चित करण्यात आलेला आहे व तो  HRA मध्ये समाविष्ट केला जाईल. 

अप्रत्यक्ष पगार वाढ : 
ग्रॅज्युअटी : ग्रॅज्युअटीमध्ये Rs.386 रुपये वाढ झालेली आहे.

VDA : पुणे निर्देशांकानुसार VDA देण्यात येईल.  

टर्म इन्शुरन्स : प्रत्येक कामगारांना Rs.10,00,000 ( दहा लाख रुपये ) टर्म इन्शुरन्स देण्यात आलेला आहे. बजाज ऑटो कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगारांसाठी टर्म इन्शुरन्स चालू करण्यात संघटनेला यश आलेले आहे. टर्म इन्शुरन्सचा संपूर्ण  Premium कंपनी भरणार आहे.

मेडिकल इन्शुरन्स : मेडिकल इन्शुरन्स Rs.1,00,000 ( एक लाख रुपये ) वरून Rs.2,00,000 (दोन लाख रुपये ) प्रति वर्ष करण्यात आलेला आहे. मेडिकल इन्शुरन्सचे संपूर्ण  Premium कंपनी भरणार आहे.

Earned Leave : Earned Leave घेताना 3 दिवस सुट्टी घेण्याचे बंधन काढून टाकण्यात आलेले आहे. आता एक - एक EL सुद्धा घेता येणार आहे. 

Short Leave : Short Leave आता वर्षभरात दोन वरून चार वेळा घेता येणार आहे. तसेच Short Leave आता कामाच्या सुरुवातीला किंवा शेवटी घेण्याची मुभा असणार आहे. 

CTC : सदर करारामुळे कामगारांचा Average Cost To Company Rs.62,000 ( बासष्ठ हजार रुपये) वरून साडेतीन वर्षांनंतर जवळपास Rs.80,000 ( ऐंशी हजार रुपये) पर्यंत होईल.

सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली .

करारावेळी कंपनी व्यवस्थापन यांच्यावतीने कैलास झांझरी (Head Manufacturing), नविन निझवान (  VP Chakan & Akurdi ), हरीश कापसे (Plant Head Chakan) , अमित गंभीर (Manager Support Service), दिनेश शितोळे (Manager personal) तसेच विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने दिलीप पवार (अध्यक्ष), महेश खानापूरकर (उपाध्यक्ष), राजेंद्र महाडिक (जनरल सेक्रेटरी), सुनील मिसाळ (खजिनदार), सोमनाथ हुच्चे (सह जनरल सेक्रेटरी ), नवनाथ कडू (कमिटी मेंबर), पांडुरंग पाटील (कमिटी मेंबर), राजेंद्र पाटील (कमिटी मेंबर) व कामगार सभासद उपस्थित होते.

    हा करार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऑप्शन पॉझिटिव्हचे संचालक अरविंद श्रोती, श्रमिक एकता महासंघ पुणे यांच्या वतीने सल्लागार मारुती जगदाळे, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील आणि खजिनदार रोहित पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.