चाकण : खालुंब्रे,चाकण येथील म्यूंग संग इंडस्ट्रियल इंडिया प्रा. लिमि. (Myung Sung Industrial Company India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि म्यूंग संग एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
एकूण पगारवाढ : सदर करार प्रत्यक्ष ७९०० रुपयांचा झाला. ज्यामध्ये हा करारप्रथम वर्ष ५०%, द्वितीय वर्ष २५%, तृतीय वर्ष २५%.
करार कालावधी : दि.१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२५पर्यंत एकूण तीन वर्षांसाठी झाला.
फरक रक्कम : माहे एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ ची पगारवाढ संपूर्ण फरक रक्कम मिळणार
शिफ्ट भत्ता : सेकंड शिफ्ट - रु.५०/- प्रतिदिन, थर्ड शिफ्ट - रु.७५/- प्रतिदिन
शैक्षणिक सहायता निधी : रु.५०००/- प्रति वर्षाप्रमाणे २ पाल्यापर्यंत
इत्तर सुविधा : उपहारगृह आणि वाहतूक सुविधा या मोफत असतील व बाईकवर येणाऱ्यांसाठी रु.१०००/- पेट्रोल भता देण्यात येईल
रजा : SL - ०७, CL - ०७, EL - किमान रजा १८ असतील प्रति वर्ष १ रजा अतिरिक्त देण्यात येईल व कमाल रजा २५ असतील.
शिल्लक रजा परतावा : सर्व रजा १ जानेवारी रोजी देण्यात येईल ३१ डिसेंबर उर्वरित अर्जित रजाचा परतावा देण्यात येईल एकूण वेतनावर १००% टक्के दराने देण्यात येईल.
बोनस : मूळ पगारावर ८.३३% प्रमाणे मिळेल, उत्पादकता आणि अतिरिक्त बोनस ५% उत्पादकता वाढवल्यास रु.२०००/- अतिरिक्त बोनस देण्यात येईल.
दीर्घकालीन सेवा लाभ : १० वर्ष १५ वर्ष २० वर्ष योगदानाचा टप्पा गाठल्यास बक्षीस देण्यात येईल.
आरोग्य विमा : रु.२,००,०००/- (दोन लाख) रुपये कुटुंबातील ४ व्यक्तींसाठी राहील.
अपघाती विमा : रु.१,००,०००/- (एक लाख) रुपये देण्यात येईल
कर्ज व पगार उचल : गृहकर्ज रु.१,००,०००/- (एक लाख) रुपये, परतावा कालावधी २० महिने राहील.
वार्षिक वैद्यकीय तपासणी, दिवाळी भेट, इतर सेवा व सुविधा ,व गणवेश, तसेच विवाह सायता निधी, मृत्यू सहायता निधी, हे पूर्वी प्रमाणे सर्व लाभ चालू राहतील.
सदर करारावेळी कंपनीच्या वतीने ली (MD), युंग चो (HR, GM), पार्क (GM PROD.), जालिंदर तिकोने (HR&ADMIN), सर्व विभाग प्रमुख तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष विजय नरके, सचिव केशव मगर, सहसचिव रमेश ओझा., उपाध्यक्ष युसुफ सय्यद, खजिनदार मोहन गुरव, कमिटी सदस्य राहुल कुंभार आणि रवींद्र पाटील या सर्वानी वेतनवाढ करारवरती सही केल्या.
करार संपन्न करण्यासाठी श्रमिक एकता महासंघ सल्लागार, कामगार नेते मारुतीराव जगदाळे, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार तसेच हुंडाई एम्प्लॉईज युनियनचे सचिव रोहित पवार तसेच सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांचे सहकार्य मिळाले.
सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्य प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.
