चाकण : निघोजे येथील महिंद्रा लॉजिस्टिक लिमि (Mahindra Logistics Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये दुसऱ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै.महेशदादा लांडगे, पै.रोहिदास गाडे, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय नायर, उद्योजक संतोष शिंदे व अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम दि.३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
- एकूण पगारवाढ : रु.१२,८००/- ( बारा हजार आठशे रुपये)
- कराराचा कालावधी : दि. ०१/०९/२०२२ ते २८/०२/२०२६ या साडेतीन वर्षांचा राहील.
- मागील सर्व फरक कामगारांना देण्याचे मान्य केले आहे.
करारावरती कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय नायर, व्हाइस प्रेसिडेंट प्रसन्ना पहाडे, व्हाइस प्रेसिडेंट एडविन लोबो, व्हाइस प्रेसिडेंट एच.आर. हेड प्रदीप झोटिंग, श्री. जोगिंदर सिंग, सुनील धानोरकर, श्रेयस आचार्य, शेखर करंजीकर, जनरल मॅनेजर ऑपरेशन हेड मुकेश कपूर, जनरल मॅनेजर एच.आर सतीश परब, डेप्युटी जनरल मॅनेजर एच.आर धीरज सिंह तसेच संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार पै. महेश लांडगे, प्रमुख सल्लागार पै.रोहिदास गाडे, किसनशेठ बावकर, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक तेजस बिरदवडे, दत्तात्रय गवारे, भट्टू पाटील, युनिट अध्यक्ष प्रशांत पाडेकर, सरचिटणीस अभय भेगडे, सहचिटणीस दत्ता येळवंडे, खजिनदार बीभीषन घोडके, सदस्य प्रदीप पिंगळे, कुणाल कोळेकर, किरण दौंडकर, संतोष बेंडाले, यांनी सह्या केल्या.
यावेळी आमदार पै.महेश लांडगे, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय नायर, कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट प्रसन्ना पहाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप झोटिंग, सूत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले, सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि धीरज सिंह यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
