पुणे : इम्रान पटेल हे जहांगिर हॉस्पीटल पुणे येथे कुशल कामगार म्हणून कामास होते. व्यवस्थापनाने दि. २३/१०/२०१५ रोजी लेखी पत्र देऊन कामावरून काढून टाकले होते. सदरचा विवाद कामगार न्यायालयामध्ये चालू होता. इम्रान पटेल यांच्या वतीने ॲड. जाकिर अत्तार यांनी खंबीरपणे बाजू मांडली, सदर केस मध्ये उभय पक्षाचा साक्षी पुरावा व युक्तीवाद न्यायालया समोर झाल्यानंतर न्यायालयाने दि. १/१०/२०२१ रोजी निकाल दिला.
न्यायालयाच्या निकाला नुसार कामगारास पूर्ववत कामावर घेऊन, मागील काळातील ७५% वेतन देण्याचे, निकालामध्ये म्हणलेले होते. या निकालाची अंमल बजावनी करावी म्हणुन सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचे समोर प्रकरण चालू होते. सदर तक्रारी मध्ये दि ११/११/२२ रोजी हॉस्पिटल प्रतिनिधी धैर्यशील पवार, गायधनी तसेच संघटनेच्या वतीने रामचंद्र शरमाळे, रणजीत चव्हाण व कामगार इम्रान पटेल हे उपस्थित होते. व्यवस्थापन प्रतिनिधीनी कामगार न्यायालयाच्या निकालानुसार मागील काळातील वेतनाचा फरक रक्कम रुपये ११,१७,४९१/- (आकरा लाख सत्तरा हजार चार एक्यानव) या रकमेचा धनादेश कामगारास सुपूर्द केला व दि. १२/११/२०२२ रोजी कामगारास पूर्ववत कामावर घेण्याचे मान्य केले अशी माहिती रामचंद्र शरमाळे यांनी दिली.
