चाकण : येथील औद्योगिक नगरीतील देशातील वाहन उद्योगांमध्ये अग्रणीय असलेली भारतीय कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) आणि महिंद्रा कामगार संघटना यांच्यामध्ये मुदतपूर्व वेतन करार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये:-
करार कालावधी : ३.५ वर्ष करार कालावधी
पहिले वर्ष : रु.१३५००/- + महागाई भत्ता रु.९७५/- = रु.१४७७५/-
दुसरे वर्ष : रु.५००/- + महागाई भत्ता रु.९७५/- = रु.१४७५/-
तिसरे वर्ष : रु.५००/- + महागाई भत्ता रु.९७५/- = रु.१४७५/-
चौथे वर्ष : महागाई भत्ता रु.९७५/- = रु.९७५/-
एकूण पगारवाढ रु.१८,४००/- (सीटीसी एकूण वाढ : रु.२०,२००/-)
उत्पादन वाढ : १०.५%
एल टी ए : रु.२०००/- रुपये वाढ करून रु.४५००/- करण्यात आली.
नाईट शिफ्ट भत्ता : रु.१२५/- वाढ करण्यात आली.
शिलाई भत्ता : रु.९५०/- वाढ करण्यात आली.
उचल : उचल मध्ये २ Gross Salary उचल म्हणून देण्यात येईल. त्याची परतफेड १२ EMI मध्ये असेल. (वार्षिक ७५ कामगार)
रेनकोट/स्वेटर : वेतन कराराच्या कालावधीत देण्यात येईल.
मेडिक्लेम : पॉलिसीमध्ये रु.२५,०००/- रुपये वाढ करून रु.१,७५,०००/- करण्यात आली.
मेडिक्लेम बफर पॉलिसी : १० बफर वाढवून वार्षिक ३० बफर करण्यात आली. प्रत्येकी १ लाख ७५ हजार रुपये पर्यंत देण्यात येणार आहे.
आई वडील यांच्यासाठी नवीन मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात येईल.
शट डाऊन हा पूर्वी शंभर टक्के कामगार रजेचा सुरुवातीला होता तो बदलून ५०% : ५०% करण्यात आला.
शट डाऊन साठी ॲडव्हान्स रजा कापल्या (BLOCK) करत होतो. त्या आता केल्या जाणार नाही.
हाफ डे (Persnol Emergency), लिव्ह- SL मध्ये 1 ने वाढ करण्यात आली.
PL चे Slab पूर्वीचे मध्ये बदल करून नव्याने आखणी करण्यात आली आहे यामुळे अप्रत्यक्षरीत्या PL मध्ये वाढ होणार आहे.
PL- ५ ने वाढ करून ७५ करण्यात आली.
EL- ५ ने वाढ करून ३७ करण्यात आली.
तीन बस रूट किलोमीटरची मर्यादा वाढवून नारायणगाव, सासवड आणि उरुळी कांचन पर्यंत करण्यात आले.
डेथ फंड : नैसर्गिक मृत्यू आणि अपघाती मृत्यूमध्ये वाढ करण्यात आले आहे.
मृत कायमस्वरूपी कामगारांच्या जागेवर त्यांच्या पत्नीस कंपनी पॉलिसी प्रमाणे कामावर घेण्यात येईल असे ठरवण्यात आले आहे.
नाष्टा टाईम मध्ये बदल करण्यात आला असून शिफ्टच्या मध्ये (८.३०/५.३०) नाष्टा टाईम घेण्यात आला आहे. यासाठी एक स्वतंत्र कमिटी स्थापन करून त्याच्यामार्फत नियम व अटी ठरवण्यात येतील.
सदर मुदतपूर्व यशस्वीरीत्या करार करण्यासाठी संघटनेचे प्रमुख सल्लागार माजी राज्यमंत्री श्री सचिन भाऊ अहिर याचें मोलाचे सहकार्य लाभले असून, करारा वरती संघटनेच्या वतीने संघटनेचे सल्लागार सचिन भाऊ अहिर तसेच संघटनेचे अध्यक्ष सागर भोसले, सचिव सुशांत मोहिते, उपाध्यक्ष विजय निंबळे, सहसचिव रवींद्र काळभोर, खजिनदार पवन(आप्पा) जाधव, सदस्य सागर केवट, विक्रम पाटील, वैभव पवार, नितेश शिर्के, रोहन जगताप यांनी आणि व्यवस्थापना तर्फे महिंद्रा कंपनीचे सीईओ शेनाॅय, प्लांट हेड नासिर देशमुख, व्हॉइस प्रेसिडेंट विजय नायर, जनरल मॅनेजर इ आर श्रेयश आचार्य, डेप्युटी जनरल मॅनेजर ज्ञानेश पोतदार यांनी स्वाक्षरी केल्या.
