पुणे : कोंढापुरी, पुणे येथील बुरखार्ट कॉम्प्रेशन इंडिया प्रा. लिमिटेड (Burckhardt Compression (India) Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि बुरखार्ट कॉम्प्रेशन कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :
करार कालावधी : कराराचा कालावधी तीन वर्ष असेल (०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४)
प्रथम वर्ष : रु.७६०१/-रुपये (४०%)
दुसरे वर्ष : रु.५६९९/- रूपये (३०%)
तिसरे वर्ष : रु.५६९९/-रुपये (३०%)
फरक रक्कम : दि.१ जानेवारी २०२२ पासून ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.
नाईट शिफ्ट अलाऊंस : प्रतिशिफ्ट १५०/- रुपये नाईट शिफ्ट अलाऊंस देण्याचे मान्य करण्यात आले.
रजा : PL रजेमध्ये १ ने वाढ करण्यात आली.
GPA (ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी) : प्रति कामगार रुपये १५ लाखांवरून रुपये २५ लाख ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी काढण्यात येणार आहे.
जर ५ वर्षे सर्विस पूर्ण --- 60% of Basic Salary
10 वर्षे सर्विस पूर्ण---70% of Basic Salary
15 वर्षे सर्विस पूर्ण---80% of Basic Salary
याप्रमाणे जास्तीत जास्त दहा वर्ष किंवा सेवानिवृत्त होईपर्यंत दरमहा वेतन देण्यात येईल.
युनियन ऑफिस भाडे : युनियनच्या ऑफिससाठी दरमहा ८०००/- रुपये भाडे देण्याचे मान्य करण्यात आले.
तसेच मागील सर्व चालू सुविधा यापुढे चालू राहतील.
करार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोरजी ढोकले, उपाध्यक्ष राजूआण्णा दरेकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, अविनाश वाडेकर, गणेश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
करारकरिता व्यवस्थापनाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर मिलिंद वागळे, असिस्टंट जनरल मॅनेजर मॅन्युफॅक्चरिंग (फॅक्टरी हेड) वरदराजा पै., सीनियर मॅनेजर एचआर रवींद्र शेलार, असोसिएट मॅनेजर एचआर अभिजीत पाटील तसेच कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष बापूराव पानसरे, उपाध्यक्ष माधव दवणे, ज.सेक्रेटरी हेमंतकुमार देशमुख, सह.जन.सेक्रेटरी दत्तात्रय बनकर, खजिनदार राजाराम शिंदे (मामा), सदस्य मोहन काळोखे, नवनाथ तिकोने यांनी काम पाहिले. तसेच रघुनंदन गुणाजी, दिनेश खोंडे, मंगेश भालेराव यांचे सहकार्य लाभले.
%20Pvt.%20Ltd.jpg)