श्रमिक एकता महासंघ व इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियनच्या संयुक्त विद्यमाने कामगार प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न

पुणे : श्रमिक एकता महासंघ व इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियन च्या संयुक्त विद्यमाने Stop precarious work असा मेसेज जगभरातील कामगार व कारखानदारांना देण्यासाठी "Day for Decent Work" हा 7 ऑक्टोबर रोजी जगभर पाळला जातो. त्याचा भाग म्हणून रविवारी  दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी  श्रमिक एकता महासंघ व इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियन च्या संयुक्त विद्यमाने या संदर्भातील जागृती व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना यासंदर्भातील विविध कायदेशीर बाबी व इतर गोष्टींची माहिती देण्यासाठी व इतर प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास व लीडरशीप प्रोग्रॅम हा सिजन्स बेंक्वेट हॉल (Seasons Banquet Hall) यमुना नगर निगडी येथे आयोजित केला होता. विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी व कामगार असे 115 प्रतिनिधींनी या कार्यक्रमात भाग घेतला.

    भारत फोर्ज चे Admin व IR विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ.अभिजित शहा साहेब यांनी सध्या स्पर्धेच्या परिस्थितीत व्यवस्थापनाची भूमिका तसेच कामगार, संघटना व व्यवस्थापन यांच्यातील औद्योगिक संबंध सुरळीत ठेवण्यासाठी गरजेच्या गोष्टी  यासंधार्भात मार्गदर्शन केले. 

    मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. नितीन कुलकर्णी यांनी Domestic enquiry व विविध कामगार कायदे आणि कंत्राटी कायद्यातील तरतुदी तसेच MRTU and PULP Act, Industrial Dispute Act. च्या विविध तरतुदींची माहिती सांगितली. त्यासंदर्भात प्रतिनिधींच्या शंका समाधान केले तसेच त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

    ऑप्शन पॉझिटिव्ह चे संचालक अरविंद श्रौती यांनी भविष्यात होणारे तांत्रिक बदल व नवनवीन तंत्रज्ञानामुळे औद्योगिक संबंधात येवु शकणाऱ्या अडचणी तसेच यावर कामगारांसाठी असलेल्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.

    श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे यांनी कामगार कायद्यातील विविध तरतुदींच्या आधारे कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कायदेशीर लढा देऊ शकतो. प्रचलित असलेले कामगार कायदे यांचा वापर ,तसेच येणाऱ्या नवीन कामगार कायद्यातील कामगार हिताच्या तरतुदी शोधून त्याचा आपण उपयोग कसा करू शकतो. संघटना प्रतिनिधी यांनी संघटनशक्ती मजबूत करण्यासाठी परस्पर समन्वय व एकमेकांना सहकार्य करण्याबतची गरज अधोरेखीत केली. कंत्राटी कामगार, निम (NAPS) कामगार व इतर कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत असलेले कामगारांना कायदेशीर प्रोटेक्शन अजून मजबूत कसे करता येईल व पुढील ॲक्शन प्लॅन यावर मार्गदर्शन केले.

    श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून कामगार हिताचे व उद्योगाला पूरक असे धोरण ठेवून कामगार प्रतिनिधी घडवण्याचे काम केल्याचे व सातत्याने चालू आल्याचे सांगितले. भविष्यात अजून वेगवेगळ्या विषयावरील ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित करणार असल्याचे सांगून सर्वांना एकत्र घेऊन संघटित पणे कामगारांचे हित जोपासू शकतो त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

    महासंघाचे सल्लागार व पिंपरी चिंचवड चे माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी ही सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच शासकीय कामासाठी केंद्र व राज्य सरकार पर्यंत पाठपुराव्यासाठी सहकार्य व प्रयत्न करणार असल्याचे ही सांगितले. आभार प्रदर्शन होऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.