कामगार कल्याण मंडळाचे "पाठ्यपुस्तक सहाय्य योजना" करिता ऑनलाईन अर्ज सुरु

ज्या कामगारांना LIN नंबर मिळाला आहे व ते त्याभागातील कामगार कल्याण मंडळ केंद्राचे सभासद झाले आहेत अशा कामगार व कामगार कुटुंबीयांकरिता "पाठ्यपुस्तक सहाय्य योजना" याचे अर्ज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची वेबसाइट वरती ऑनलाईन अर्ज करावेत याची अंतिम दिनांक ३१ सप्टेंबर २०२२ आहे.

योजना कोणासाठी आहे -

साखर कारखाने, खाजगी  कंपनी, सुतगिरणी, लहाण मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा फॅक्ट्ररी अँक्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, बाँम्बे शाॅप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना मध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हि योजना दरवर्षी चालविते.

पाठ्यपुस्तक सहाय्य योजना - ११ वी पासून पुढील सर्व शिक्षणक्रमासाठी 

११ वी ते १७ वी पर्यंत - रु.१५००/- पर्यंत किंवा पुस्तक खरेदी किमतीची ५०%

डिप्लोमा कोर्सेस - रु.१५००/- पर्यंत किंवा पुस्तक खरेदी किमतीची ५०%

इंजिनियरिंग व मेडिकल डिग्री - रु.२५००/- पर्यंत किंवा पुस्तक खरेदी किमतीची ५०%

नियम अटी :
पालकाच्या उत्पन्नाची अट- ₹. ५ लाख (वार्षिक उत्पन्न)
यावर्षी १० वी पास करुन ११ वित असलेल्या पासून पुढील सर्व शिक्षणासाठी.
अर्ज करण्यासाठी कमीत कमी उत्तीर्ण आवश्यक.
online विहित नमुण्यातिल अर्ज भरावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे : 

  • मागील वर्षीची गुणपत्रिका, फक्त ११ वी नंतरच्या वर्गांसाठी.
  • सर्व क्रमिक पुस्तकाची यादी वर प्राचार्याची सही असलेला दाखला जोडावा. (दाखल्याची कोरी प्रत मिळविण्यासाठी 8600888843 , 97675 60211 नंबरवर फोन/ व्हाटसप करावे.)
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • विद्यार्थी आधार कार्ड
  • पालकाचे आधार कार्ड
  • पालकाची माहे जुन २०२२ ची पगारस्लिप, 
  • विद्यार्थ्याचे बँक पासबुक,
  • पुस्तक खरेदीची ओरिजनल पावती (cash memo) या पावतीवर खरेदी केलेल्या पुस्तकाचे ठळक नाव, किंमत रक्कम, एकुण रक्कम, अक्षरी रक्कम, दुकानदाराची सही, दुकानाची पावती हि प्रिंटेड असावी. ती शिक्क्याची चालणार नाही. त्यावर पावती क्रमांक असायला हवा.)

(सर्व कागदपत्रे ओरिजनलची स्कॅन काॅपि अपलोड करावी. झेराॅक्स अपलोड केल्यास अर्ज नामंजूर होईल.)

दिव्यांग पाल्य - पुस्तक खरेदीची १००% रक्कम देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - ३१ सप्टेंबर २०२२

ऑनलाईन अर्ज कसा भरावा -  

  • वेबसाईट https://public.mlwb.in हि वेबसाईट ओपन करा.
  • आपल्या कंपनीतून कामगाराने स्वतःचा LIN number आणि कंपनी मध्ये नोंदविलेला mobile number मिळवावा. (लिन नंबर हा युजर आय डी व मोबाइल नंबर हा पासवर्ड आहे. मागील वर्षिचा लिन नंबर सुरुवातीस टाकून पहावा. नसेल तर कंपनीकडून नविन क्रमांक घ्यावा.) यामध्ये District - Division -Circle - Center - निवडावे अशा नोंदी कराव्यात.
  • पुढिल योजना मिळविण्यास आपले सर्व कुटुंबियांस member (सभासद)  करावे.
  • माहिती भरून स्वत: कामगार व त्या सर्वांचे online पैसे भरावेत. 
  • प्रत्येकाचे आधार कार्ड व कामगाराची जुन 22  ची पेस्लिप / अस्थापनाचा दाखला अपलोड करावे. 
  • membership केल्यानंतर  आपल्याभागातील कामगार कल्याण केंद्र यांचे कडून त्याचे approval करुन घ्यावे. (फोन करावा)
  • Membership option मध्ये Application For Schemes याची निवड करुन "पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेचा" अर्ज भरावा.
  • त्यातील आवश्यक सर्व माहिती भरावी.
  • कागदपत्रे पीडीएफ / Jpg Files अपलोड कराव्यात.
  • अर्ज पुन्हा एकदा तपासून submit करावा.
  • कामगाराच्या मोबाइल वर OTP येतो तो टाकावा.
  • तयार झालेल्या अर्जाची प्रिंट काढावी व संबंधित कामगार कल्याण केंद्र यांच्याशी संपर्क करावा.