कायद्यामध्ये तरतूद असून देखील विविध कंपनी, आस्थापना, कंत्राटदार कामगारांना पगार स्लिप (Wage Slip) देत नाही

किमान वेतन कायदा १९४८ कायद्याप्रमाणे प्रत्येक कामगाराला जरी तो कंत्राटी असेल तरी पगार स्लिप (Wage Slip) देणे बंधनकारक आहे. परंतु विविध आस्थापना / कंपनी / शासकीय,निम शासकीय कार्यालयामध्ये काम करत असताना कामगार, कंत्राटी कामगार, कर्मचारी यांना प्रत्येक महिन्याची पगार स्लिप (Wage Slip) दिली जात नाही असे आढळून येते. 

     प्रत्येक काम करणाऱ्या कामगार, कंत्राटी कामगार, कर्मचारी यांना ते काम करत असलेल्या ठिकाणी प्रत्येक महिन्याची पगार स्लिप (Wage Slip) मिळणे कायद्याने बंधनकारक असून याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. 

     याबाबत शासनाने संबंधित आस्थापना / कंपनी / शासकीय,निम शासकीय कार्यालय / सर्व कंत्राटदार यांना निर्देश देणे तसेच कार्यवाही करणे गरजेचं आहे.