राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघद्वारे कामगार प्रतिनिधींसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिर संपन्न

पुणे : राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ आपल्या प्रथेप्रमाणे दरवर्षी संलग्नित असणाऱ्या प्रतिनिधींसाठी आणि कामगार सभासदांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत असते. नुकतेच दिनांक २५ सप्टेंबर २०२२, रविवार रोजी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ तर्फे संलग्नित असणाऱ्या प्रतिनिधींसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबीर सिजन्स २४, बँकेट हॉल वाघोली,पुणे येथे संपन्न झाले 

   सदर नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अ‍ॅड.आदित्य जोशी (माजी अध्यक्ष लेबर लॉ प्रॅक्टिशनरस असोसिएशन, पुणे) यांनी केले.सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये महासंघाला संलग्नित असणाऱ्या विविध कामगार संघटनांच्या १२० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

सदर नेतृत्व विकास शिबिरामध्ये अ‍ॅड. विशाल जाधव यांनी बदलते कामगार कायदे आणि त्याचे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे कामगारांच्या समोर असलेल्या सध्याची परिस्थिती मध्ये त्यांची मानसिकता आणि संदेशवहन याबाबतचे मार्गदर्शन सचिन तायडे यांनी केले.

तसेच दत्ता धामणस्कर यांनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामधील संबंध या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर ढोकले यांनी कामगार व कामगार संघटनांच्या समोर असलेली सध्याची परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर ढोकले हे होते तसेच महासंघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, उपाध्यक्ष राजेंद्र दरेकर, जनरल सेक्रेटरी अविनाश वाडेकर, सेक्रेटरी गणेश जाधव, राकेश चौधरी, व इतर प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सह सेक्रेटरी रुपेश वर्पे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.