पुणे : शिक्रापूर येथील एन्काई व्हील्स इंडिया लिमि. (Enkei Wheels India Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि एन्काई कामगार संघटना यांच्यामध्ये चौथा वेतनवाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे -
करार कालावधी : सदर करार 4 वर्ष कालावधीसाठी लागू असेल (दि. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2025)
प्रथम वर्षासाठी रक्कम - रु. काही नाही.
द्वितीय वर्षासाठी रक्कम - रु.10,604/-
तृतीय वर्षासाठी रक्कम- रु.3,586/-
चतुर्थ वर्षासाठी रक्कम- रु.4,820/- इतकी असेल.
फरक (एरियस्) : रु.10,604/- प्रति महिन्याप्रमाणे एप्रिल व मे महिन्याचे देण्याचे मान्य केले
नाईट शिफ्ट अलाउन्स : रु.426/- रूपये 6 दिवस सलग हजेरी असणाऱ्याला देण्याचे मान्य केले.
अवजड भत्ता : प्रत्येक दिवसाला रु.20/- प्रमाणे 26 दिवसाला रु.520/- देण्याचे मान्य केले.
पेंटिंग भत्ता : महिनाभर काम केल्यास रु.300/- मिळणार.
सी एन सी मशिन ऑपरेटिंग भत्ता : रु.300/- मिळणार.
T.M.C अलाऊन्स : रु. 300/- मिळणार.
पेट्रोल अलाउन्स : रु.300/- प्रति महिना परंतु यात ज्या कामगारांना कामाला लागल्यापासून बसची सोय नाही व आजपर्यंत कधीही बस सुविधा घेतली नाही अश्या कामगारांना मिळेल.
जानेवारी ते जून एकही लिव्ह (सुट्टी) नाही घेतली तर - रु.2,000/-
जुलै ते सप्टेंबर एकही लिव्ह (सुट्टी) नाही घेतली तर अजून - रु.2,000/-
ऑक्टोबर ते डिसेंबर एकही लिव्ह (सुट्टी) नाही घेतली तर आणखी - रु.2,000/-
असे वर्षभरात एकही लिव्ह (सुट्टी) घेतली नाही तर त्यास एकुण रु.6,000/- विशेष हजेरी बक्षीस मिळणार आहे.
26 दिवस हजर - रु.1,100/-
25 दिवस हजर - रु.600/-
24 दिवस हजर - रु.300/- प्रमाणे देण्याचे मान्य केले.
फॅमेली डे : प्रत्येक वर्षातून एकदा करण्याचे मान्य केले . आणि समर डे प्रत्येक वर्षातून एकदा करण्याचे मान्य केले (समर डे आणी फॅमिली डे साजरा करण्याचे वेळे नुसार ठरवले जाईल.)
जर काही कारणास्तव सदर कार्यक्रम रद्द झाल्यास त्याची भरपाई सुट्टी सदर दिवाळी मध्ये घेण्यात येईल
गणवेश : प्रत्येक वर्षीच्या प्रचलित पद्धतीनुसार देण्याचे मान्य केले .
अँडवान्स : प्रचलित पद्धतीनुसार बिगर व्याजी रुपये 50 हजार देण्याचे मान्य केले.
संघटना कार्यालया ऐवजी संगणक (लॅपटॉप) साठी कंपनीकडून ३०,०००/- रुपये देण्याचे मान्य केले आहे.
मेडिक्लेम पॉलिसी : रु. 4 लाख राहील त्यामध्ये कामगार व त्याचा परिवारातील दोन मुले,पत्नी हे कव्हर राहतील
डेथ बेनिफिट (मरणोत्तर सहायता निधी) :
मृत कामगाराच्या (कंपनी बाहेर नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू) कुटुंबियाना मदत म्हणून ४० लाख देण्यात येईल. त्यात कामगार व कर्मचारी प्रत्येकी ५०००/- रुपये कपात होईल त्यानंतर उरलेली रक्कम कंपनी देणार आहे. सदर रकमेत रु. 2 लाख कंपनी अतिरिक्त देणार शिवाय भविष्यात कर्मचाऱ्यांची एकूण संख्या कमी झाली तरीही लाभार्थी यास मिळणारी अंतिम रक्कम 40 लाख इतकी असेल.
आई, वडील,पत्नी आणि मुले यासाठी २ दिवस रजा मंजूर करण्यात येणार आहे.
15 वर्ष पूर्ण झाले त्यांना रुपये 3,000/- सोबत मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
२० वर्ष पूर्ण झाले त्यांना रुपये 5,000/- सोबत मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
25 वर्ष पूर्ण झाले त्यांना रुपये 6,000/- सोबत मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
हक्काच्या रजेचे साठवणूक : 60 ऐवजी 70 करण्यात आली आहे.
वाहतूक सुविधा : तळेगावची बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
आपात्कालीन सुविधा : कामगारांना घरी जाण्यासाठी वाहतूक सुविधा 60 किमी पर्यंत करण्यात आली.
PH दिवशी कामावर आल्या नंतर दुप्पट OT + रु.750/- देण्यात येईल
उष्णता भत्ता : पूर्वीचा मिळणारा उष्णता भत्ता हा रु.650/- वरून रु.1000/- करण्यात आला.
2022 चा दिवाळी साठी रु.34,000/-
2023चा दिवाळी साठी रु.36,000/-
2024 चा दिवाळी साठी रु.40,000/-
रजेतील वाढ : प्रचलित रजा संख्येत 1 PL ची वाढ करण्यात आली आहे. सदर PH मध्ये रक्षाबंधन या सणासाठी पगारी रजा मान्य करण्यात आली आहे.
कराराचे वैशिष्ट्य : फक्त 10%कामगारांच्या कामात वाढ. काही विभागाचे मागील करारातील प्रोड्क्शन टारगेट मध्ये कपात.
सदर करार यशस्वी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन वतीने संदीप ओहोळ (सिनीअर व्ही पी/ प्लॅन्ट मॅनेजर), योगेश चांदगुडे (HR हेड), संजय माथाडे (परचेस प्रमुख), जितेंद्र परमार (फायनान्स हेड), संतोष नाईक सर (एच आर मॅनेजर) आणि युनियनच्या वतीने अध्यक्ष अनिल हरगुडे, ज.सेक्रेटरी पांडुरंग खैरे, उपाध्यक्ष शरद झांबरे, खजिनदार संतोष मेमाणे, सदस्य राहुल शिंदे, अनिल चव्हाण, सचिन कोलपे, दत्तात्रय गायकवाड, सतिष पाटील उपस्थित होते.