नागपूर : हिंगणा रोड नागपूर येथील महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी व्यवस्थापन व सत्यविजय कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दि. ९ मे २२ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
- १) सर्वांना सरासरी पगारवाढ रू. १४५०१/- देण्यात आली.
- २) सदर करार हा ३ वर्षे ९ महिन्याकरिता (दि.१ मे २०२२ पासून ते दि.३० नोव्हेंबर २०२५) करण्यात आला.
- ३) पुढील वेतन करार संपण्यापूर्वी ६ महिने अगोदरच मागणीपत्र सादर करून ठरलेल्या तारखेस वेतन करार करण्यात येईल.
- ४) नविन वेतन करारानुसार खालील प्रमाणे सरासरी वेतन राहील.
सर्व्हिस १० वर्ष - २० वर्षे असणारे कामगार - रू. ७५०००/-
सर्व्हिस २० वर्षापेक्षा अधिक असणारे कामगार - रु.९३०००/-
- लवकरच थकबाकी सुध्दा मिळणार आहे.
यावेळी कामगार प्रतिनिधी दया डांगरे, बाबा मानकर, प्रमोद पाल, विनायक अवचट व अक्षय साहू तसेच सत्यविजय कामगार संघटनेचे सचिव संजय गावंडे, संपूर्ण कार्यकारीणी व अध्यक्ष संजय महाले या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे हा वेतन करार संपन्न झाला.
सदर करारावर अप्पर कामगार आयुक्त राजदिप धूर्वे यांच्या समक्ष स्वाक्षरी सोहळा संपन्न झाला. सदर सोहळ्यास कंपनीतर्फे श्रीकांतजी डूबे, अभिजित कळंबे, सुहास पाटील व वाटाघाटी समिती आणि सत्यविजय कामगार संघटनेचे पदाधिकारी, सचिव संजय गावंडे व अध्यक्ष संजय महाले उपस्थित होते.
