ZF India Pvt. Ltd येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : चाकण औद्योगिक वसाहाती मधील वासुली येथील ZF India Pvt. Ltd व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार  आमदार पै. महेशदादा लांडगे,  पै. रोहिदास गाडे व अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार दिनांक १४/०४/२०२२ रोजी संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये : 

  • १) एकूण पगारवाढ : रु.२२,६७८/- (बावीस हजार सहाशे अष्टयाहत्तर) 

         पगाराचा रेशो:- पहिल्या वर्षी ८०% दुसऱ्या वर्षी १०% तिसऱ्या वर्षी १०% मिळणार.

  • २) कराराचा कालावधी : ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२४ या तीन वर्षांचा राहील.

  • ३) मेडिक्लेम पॉलीसी : २,००,०००/- रुपये संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची १०,००,०००/- रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले आणि आई वडील यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • ४) मृत्यू साहाय्य योजना :
            अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व २१ लाख रुपये कंपनीकडून कायदेशीर                               वारसास मिळणार.
             ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व                     योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.

  • ५) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : ३५ लाख रुपये रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.

  • ६) जर एखाद्या कामगाराचा कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास त्यामुळे त्याचे काही काळा नंतर उद्धवणार्‍या आजाराचा खर्च पूर्णपणे कंपनी करनार.
  • ७) सूटया :
            A) PL - २१,
            B) SL - ०८
            C) CL - ०७ 
            D) PH - ११
            E) मतदानाची सुट्टी :  सरकारी आदेशानुसार राहील,
            F) दुखवटा सुट्टी : कामगारच्या घरातील, नात्यामधील (ब्लड रिलेशन) मधील कोणी मयत झाल्यास                          पगारी सुट्टी ६ दिवस.
          G) पितृत्व रजा : पुरुष कामगाराला पितृत्व रजा म्हणून पगारी सुट्टी तीन दिवस

  • ८) दिवाळी बोनस : कायदेशीर बोनसच्या व्यतिरिक्त अधिकचा CTC च्या बाहेर ८००१/- रुपये रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, व १५००/- रुपये रकमेची एक भेट वस्तू देण्यात येईल.

  • ९) मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १०००/- (एक हजार) रुपये देण्याचे मान्य व कंपनीमध्ये अपघात झाल्यास तो कामगार या योजनेस पात्र राहील 

  • १०) सेवा बक्षीस :
          A) ५ वर्षे नोकरी झाल्यास रु. ५,०००/-,
          B ) ७ वर्षे नोकरी झाल्यास रु. १०,०००/-,
           C) १० वर्षे नोकरी झाल्यास रु. १५,०००/- 

  • ११) वैयक्तिक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास १,००,०००/- (एक लाख) रुपये देण्याचे मान्य, तसेच यापेक्ष्या जास्त रक्कम हवी असल्यास एकत्रित चर्चा करून मदत करण्यात येईल

  • १२) जादा कामाचा मोबदला :  साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामावर आल्यास दोन पट पगार व एक सुट्टी देण्याचे मान्य

  • १३) कँटीन व बस सुविधा : a) मंगळवारी नाष्टयासाठी दोन अंडी आणि बुधवार आणि शुक्रवारी जेवणामध्ये अंडी देण्याचे मान्य

           b) तळेगाव व खेड येथून नवीन बस सुविधा चालू करण्यात आली आहे

  • १४) ड्रेस :
            a) उच्च प्रतीचे टी शर्ट - ३,
            b) पॅन्ट - २, 
             c) शूज - १२००/- रुपये किंमतीचे,
             d) जर्किंग - पहिल्या वर्षी १०००/- , दुसऱ्या वर्षी १२००/-, तिसऱ्या वर्षी १४००/- रुपये रक्कमेचे राहतील

  • १५) बक्षीस योजना : कामगारांच्या मुला-मुलींसाठी बक्षीस म्हणून कमीत कमी पाचशे रुपये देण्याचे मान्य

  • १६) गुणवंत कामगार पुरस्कार : प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना ६,०००/- (सहा हजार) रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य

  • १७) पाळी भत्ता : तिसरे पाळीसाठी पन्नास रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य तसेच नाश्त्यासाठी पहिल्या ब्रेकमध्ये दूध आणि केळी, दुसऱ्या ब्रेकमध्ये दूध आणि बेकरी ॲटम तसेच शेवटी रेगुलर नाष्टा देण्याचे मान्य

  • १८) फरक : प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १२ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.

         करारावरती  संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै.  महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस  कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, महादेव येळवंडे, निलेशशेठ मुळे, साईराज येळवंडे, तेजश बीरदवडे, प्रशांतआप्पा पाडेकर, रविंद्र भालेराव, यूनिट अध्यक्ष तुषार पवळे, उपाध्यक्ष विक्रम सुक्रे, सरचिटणीस राहुल भोसले, सहचिटणीस अंगद चौधर, खजिनदार आतिब शेख, संघटक प्रतीक कदम, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे सी.ई.ओ.प्लांट हेड. निलेश फणसे, एच आर मॅनेजर रवी हंगारगे, नचिकेत वसंत गडकर, शामबाबू आकुला, प्रदयुम्न कुलकर्णी यांनी सह्या केल्या. 

      संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार  पै. महेशदादा लांडगे, अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनी प्लांट हेड. निलेश फणसे यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक एच.आर हेड रवी हंगारगे यांनी केले, तसेच सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला.