पुणे : मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथील रोची इंजिनिअरिंग प्रा.लि व भारतीय कामगार सेना यांच्या मध्ये वेतन वाढीचा करार संपन्न झाला.भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस,शिवसेना उपनेते, डॉ.रघुनाथ कुचिक व कंपनी व्यवस्थापना तर्फे मालक गौतम खारकर यांच्या उपस्थितीमध्ये हा करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :
- कराराचा कालावधी तीन वर्षाकरिता (दि. १ एप्रिल २०२१ ते दि. ३१ मार्च २०२४)
- एकूण पगारवाढ ९,०००/- आणि इतर सवलती मिळणार
- फरक रक्कम कामगारांना देण्यात येणार
यावेळी राहुल व्होरा, सहचिटणीस शुभम दिघे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम गायकवाड, कार्यकारणी सदस्य संदेश सुर्वे, अनिल जगताप, सौरभ खारकर, निलेश लगोटे, उमेश साळुंके, श्याम भेगडे, राहुल गायकवाड, जीवन शिंदे, रुपेश शेलार, तुकाराम केमसे, बाळासाहेब नरवडे हे उपस्थित होते. कामगारांनी अधिक मेहनतीने गुणवत्तेचे काम करुन कंपनीची भरभराट करावी व व्यवस्थापनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन रघुनाथ कुचिक यांनी केले.