औरंगाबाद : सिटू सलग्न मुंबई श्रमिक संघ हि युनियन गुडईयर टायर्स प्रा लिमिटेड एच १८ एमआयडीसी वाळूज औरंगाबाद येथे कार्यरत असुन कंपनीत ६४३ कायमस्वरूपी कामगार युनियनचे सदस्य आहेत मागील १० महिन्यापासून वेतनवाढीच्या करारासंदर्भात चर्चा व्यवस्थापनाबरोबर सुरु होते दि.२० एप्रिल २०२२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
(पहिला टप्पा २० महिन्यासाठी रु.१६,०००/- व दुसरा टप्पा १२ महिन्यासाठी रु.६,५००/-)
- 1. महागाई भत्ता प्रत्येक पॉईंटला १ पैसे वाढ
- 2. फेस्टिवल ऍडव्हान्स रु.१४,०००/- वरून रु.२५,०००/-
- 3. २५ वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मिळणार सर्व्हिस अवॉर्ड रु.१५,०००/- वरून रु.२०,०००/- करण्यात आला.
- 4. कामगारांच्या अपत्यांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी व बहिणीच्या लक्षासाठी बिनव्याजी कर्ज रु.१,५०,०००/- करण्यात आले,
- 5. वार्षिक भेट मध्ये वाढ करण्यात आली.
- 6. मेडिक्लेम पॉलिसीमध्ये ७९ कामगार बांधवाना रु.४२६०/- वार्षिक वाढ करण्यात आली.
- 7. निवृत्त होणाऱ्या कामगार बांधवाना त्यांच्या कायदेशीर मिळणाऱ्या बाबी व्यतिरिक्त रु.५०,०००/- मदत म्हणून दिले जाईल.
- 8. दुर्धर आजार झाल्यास कंपनीकडून २ लाख रुपये मदत म्हणून दिले जाईल व त्यास ९० दिवसाचा अर्धा पगार दिला जाईल.
- 9. ऍडव्हान्स बोनस मध्ये २.५० रुपये प्रत्येक दिवसाला वाढ करण्यात आली.
- 10. मयत कामगारांच्या वारसास १ दिवसाचा सर्व कामगारांचा पगार व दीड पट कंपनी देणार.
- 11. वार्षिक मूळ पगारात ४० पैसे दिवसाला वाढ करण्यात आली,
अशा प्रकारे पगारवाढ करार झाला असुन त्यामुळे कामगारांचा सरासरी पगार ६७,०००/- हजार रुपये वरून ८८,५००/- रुपये होणार आहे व सीटीसी पगार १ लाखापेक्षा जास्त होईल.
देशातील सर्व टायर्स कंपन्यांपेक्षा हा पगार उच्च असुन औरंगाबाद इंडिट्रिस मधील हा सर्वात जास्त पगार वाढीचा करार आहे. या पागारवाढीने सर्व कामगार बांधवात आनंदाचे वातावरण असुन गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला.
या प्रसंगी युनियनच्या वतीने मुंबई श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉ.डॉ.विवेक मॉन्टयारो, जन सेक्रेटरी कॉ.हेमकांत सामंत, उपाध्यक्ष कॉ.सईद अहमद, सचिव कॉ.राजेंद्र देवकर तसेच गुडइयर टायर्स युनिट अध्यक्ष कॉ.अर्जुन पिटेकर जनसेक्रेटरी कॉ.शिरीष कमळजकर, उपाध्यक्ष कॉ.काशिनाथ साळुके, उपाध्यक्ष कॉ.राजू शिंदे, जॉईंट सेक्रेटरी कॉ.शरद मलिक, खजिनदार कॉ.दिगंबर गायके, सदस्य कॉ.शंकर पाटील व कॉ.शिवाजी मार्कंडे व व्यवस्थापनातर्फे एम डी आशु गोयल, एच आर डायरेक्टर विशाल डिग्रा, एच आर प्लांट हेड कॅप्टन वीरेंद्र गायकवाड, प्रोडक्शन प्लांट हेड योगेश साखरे, पर्सनल मॅनेजर जीवन पाठक व तसेच कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत, सहायक कामगार उपआयुक्त गजानन बोरसे हजर होते. यासर्वांच्या उपस्थितीत पगारवाढीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.