डी.एस.एम इंडिया प्रा.लि. (DSM India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील डी.एस.एम. इंडिया प्रा.लि. (DSM India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि राष्ट्रवादी कामगार संघटना यांच्या मध्ये  तिसरा वेतन वाढीचा करार दि.11/04/2022 रोजी यशस्वीरीत्या व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. 

कराराची ठळक वैशिष्ट्ये : 

  • १) पगार वाढ : प्रत्येक कामगाराला प्रत्यक्ष 21,000/-  रुपयांची भरघोस पगारवाढ  करण्यात आली आहे.

  • २) करार कालावधी : हा करार 04 वर्षांसाठी असेल दि. 1 एप्रिल 2021 ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीसाठी असणार आहे.

         1) 45%
         2) 25%
         3) 15%
         4) 15%

  • 3) मेडिकल चेक-अप : वर्षातून 1 वेळेस  होईल.

  • 4) गाडीसाठी नवीन मार्ग चालु करण्यात येणार - तळेगाव ढमढेरे, राऊतवाडी 

  • 5)  कॅन्टीन : कॅन्टीन सुविधा  चालू आहे  तशीच राहील

  • 6) स्नेह संमेलन : वर्षातुन एकदा चालू प्रथेप्रमाणे चालू राहील 

  • 7) सहल : वार्षिक सहल ही चालू प्रथेप्रमाणे राहील याच्या मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही    

  • 8) फरक : हा करार १ एप्रिल २०२१ पासून सुरु होऊन ३१ मार्च 2025 रोजी संपणार आहे. या करारावर सह्या मार्च २०२२ मध्ये होत आहेत. म्हणून एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या बारा महिन्याचा एकरकमी 1,26,000/- फरक कामगाराांना देण्यात येईल. 

  • 9) हजेरी भत्ता : प्रती महीना रु.1200/- सुरू करण्यात आलेला आहे

  • 10) रात्र पाळी भत्ता : रु.100/- प्रतीदिन सुरू करण्यात आला.

       सदर वेतनवाढ करारामध्ये कंपनी कडून उदय शेट्टी, गायत्री फौजदार, संदीप जावळे, नितीन पाठक प्रफुल्ल भावसार, बाळासाहेब सोळंकी तसेच युनियन तर्फे कामगार नेते महेश पाटील, प्रसाद तनपुरे, पंडीतअप्पा दरेकर, शिवाजीराव दरेकर, शैलेश कुंडलिक काळभोर, सचिन शिवाजी परकाळे, सागर साहेबराव फलके, महेंद्र रावसाहेब यादव, शंकर नारायण हाडके सर्वांनी करार यशस्वी करण्यात सहयोग केला.