पुणे : पिरंगुट येथील फोनिक्स मेकॅनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Phoenix Mecano India Private Limited) कंपनी व्यवस्थापन व भारतीय कामगार सेना यांच्या वतीने येथील कामगारांसाठी पगार वाढीचा आणि अन्य सुविधांचा सलग तिसरा व अतिशय उत्तमरीत्या करार मैत्रीपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी, शिवसेना उपनेते श्री.डॉ.रघुनाथ कुचिक यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच कोरोना काळात कंपनी व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सामंजस्य भूमिकेमुळे सदर करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :
- कराराचा कालावधी तीन वर्षाकरिता (दि. १ ऑक्टोबर २०२१ ते दि. ३० सप्टेंबर २०२४)
- एकूण पगार वाढ १५,०००/-
- विमा रु.३ लाख करण्यात आला आहे.
- पगार व्यतिरिक्त रु.१२०० /- इन्सेन्टिव्ह मिळणार
- कामगारांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाणार
- मागील सर्व सुविधा पुढे कायम करण्यात आल्या
सदर करार संपन्न होण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक सौरभ शुक्ला, प्रॉडक्शन मॅनेजर विजय जोशी, प्लॅनिंग मॅनेजर अतुल देशपांडे, एच आर मॅनेजर दिपक जगताप, उमेश बारवकर तसेच कामगार संघटनेच्या वतीने भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी, शिवसेना उपनेते श्री.डॉ.रघुनाथ कुचिक, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा संघटक राम गायकवाड, सुदेश सुर्वे, शुभम दिघे युनिट अध्यक्ष धनंजय नागरे, गणेश घोटकुले, राहुल ववले, नंदू देवजीकर, बाबासाहेब कांबळे, विजय जाधव उपस्थित होते.
यावेळी रघुनाथ कुचिक यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले. कंपनीतील कामगार बांधवानी आता अधिकाधिक उत्पादन वाढीकडे लक्ष द्यावे व कंपनी प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी असे आवाहन केले.