पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पत किरकोळ गोष्टी सोडल्या तर असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी काही करण्यात आलेले नाही. याअर्थसंकल्पात असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्याबाबत सरकारने सामाजिक सुरक्षा २०२० हा कायदा संमत केला परंतु त्यासाठी कुठलीही तरतूद सरकारने केलेली नाही. कामगार आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारचे धोरण स्पष्ट दिसत नाही असे मत शरद पंडित प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना यांनी दिले.
असंघटीत क्षेत्रातील कामगार कोरोणा महामारी मुळेअगोदरच त्रस्त झाला आहे. पुन्हा महागाई वाढण्याची शक्यता आहे. सरकारने बजेटमध्ये दुरुस्ती करून असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा असे पंडित यांनी सांगितले.