जे.सी.बी. इंडिया लिमीटेड (JCB India Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

मावळ,पुणे : तळेगाव औद्योगिक नगरीतील जे.सी.बी. इंडिया लिमीटेड (JCB India Ltd) व्यवस्थापन आणि जे.सी.बी.कामगार संघटना यांच्यामध्ये पाचवा वेतनवाढीचा  करार  शांततामय  वातावरणात संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • सदर करार दि.1 जुलै 2021 ते 30 जून 2024 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.

  • कामगारांना रु.16,506/- वेतनवाढ करण्यात आली, सदर रक्कम (75.15.10) टप्यामध्ये देण्याचे मान्य केले

  • मेडिक्लेम पॉलिसी (GMC) :- 2 लाख रुपये तसेच 4 लाख रुपये बफर अमाउंट ठेवण्यात आली आहे . (1+5) 

  • रूम भाडे :- रू. 3000/-

  • मुदतविमा (GTL) :- मुदतविमा म्हणुन रू.40 लाख

  • अपघात विमा (GPA) :- अपघात विमा म्हणून रू.10 लाख

  • गिफ्ट व्हाउचर :- दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये रू.1000/- एवढ्या किंमतीचे गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.

  • वार्षिक हजेरी बक्षीस :- 280 दिवस भरले जातील अशा जास्तीत जास्त 35 कामगारांना प्रत्येकी रु.2000/- दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये मिळतील.
  • सेवा ज्येष्ठता बक्षीस:-
15 वर्ष सेवा - रु.6000/-
20 वर्ष सेवा - रु.8500/-
25 वर्ष सेवा - रु.11000/-
30 वर्ष सेवा - रु.13000/-

  • शैक्षणिक उचल :- रू.30000/- (रुपये तीस हजार)

  • ब्लॉक क्लोजर :- प्रतिवर्ष 10 दिवस.  

10 दिवसांमधील 7 दिवस कंपनीचे 3 दिवस कामगारांचे.
7:3 याप्रमाणे ब्लॉक क्लोजर असतील. ब्लॉक क्लोजरचे दिवस हे LTA, CL,EL, ATTENDANCE AWARD यांच्या हिशोबसाठी पकडले जातील.

  • मागील करारातील सर्व सेवाशर्थी व अटी आहे तशाच पुढे चालु राहतील असे उभय पक्ष्यानी मान्य केले आहे.

    करारावेळी कंपनीच्या व्यवस्थापनच्या वतीने नवनीत सेठी (बिझनेस हेड), विवेक गगपल्लीवर (कन्सल्टंट), घननील केळकर (ए.वी.पी.एच.आर), अतुल कुलकर्णी (जनरल मॅनेजर- प्रोडक्शन), संजीव सोनी (जनरल मॅनेजर -प्रोडक्शन), उदयसिंग खरात (डेप्युटी जनरल मॅनेजर एच.आर) यांनी तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण घुले, जनरल सेक्रेटरी ज्ञानेश्वर तकमोगे, उपाध्यक्ष विनोद फुले, उपाध्यक्ष सलीम शेख, जॉ.सेक्रेटरी किरण पाटील, जॉ.सेक्रेटरी विनोद शिंदे, खजिनदार एकनाथ चिमकर, सदस्य मिनार गजने, मोहन कटारे, गणेश वाघवले, खंडेराव जाधव हे उपस्थित होते.  

    सदर करारासाठी श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष दिलीप पवार आणि सल्लागार मारुतीराव जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटना व व्यवस्थापन यांमधील असलेला  विश्र्वास आणि निरंतर प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.