अल्फ इंजिनिअरींग प्रा. लि.(Alf Engineering Pvt. Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : निघोजे,चाकण येथील अल्फ इंजिनिअरींग प्रा. लि.(Alf Engineering Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन व श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये दि.५ ऑक्टोबर २०२१ रोजी आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

सदर करार दि.1 डिसेंबर 2019 ते 31 नोव्हेंबर 2022 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.

पगार वाढ : रु.10,001/-

पगार वाढीतील फरक : प्रत्येक कामगाराला प्रत्येकी 23 महिन्याचा फरक देण्यात येणार

मेडिक्लेम पॉलिसी : रु.3,00,000/- करण्यात आली.

डेथ पॉलिसी : कामगाराचा मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसाचा पगार आणि कंपनीकडून रु.2,00,000/- रुपये कायदेशीर वारसास मिळणार.

ग्रुप अक्सिडेंट पॉलिसी : रु.5,00,000/- करण्यात आली 

वैयक्तिक कर्ज : रु.60,000/- देण्यात येणार 

पगाराची उचल म्हणून कामगारास त्याच्या पगाराच्या 50% पर्यंत रक्कम देण्यात येणार

रजा आणि पगारी सुट्ट्या :
PL - सर्व कामगारांना 241 ते 259 दिवस भरतील त्यास 20 दिवसाला 1 रजा व 260 दिवस भरतील त्यास PL - 21 मिळतील
SL - 07
CL - 07 
PH - 10
मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील.

दिवाळी बोनस : मार्च महिन्याचा एक ग्रॉस पगार वार्षिक बोनस म्हणून देण्यात येईल.

वार्षिक हजेरी बक्षीस :
A) 261 - 270 दिवसाला रु.700/-
B) 271 - 280 दिवसाला रु.1000/-
C) 281 दिवसांच्या पुढे रु.1251/-

बस सुविधा : येलवाडी पासून देहूमार्गे नवीन बस सुविधा सुरू होणार

वार्षिक स्नेह संमेलन : दरवर्षी कामगारांचे वार्षिक स्नेह संमेलन घेण्यात येईल.

गुणवंत कामगार पुरस्कार : दरवर्षी कामगारांमधून 1 जणांची निवड करण्यात येईल व सदर कामगारासाठी रु.5001/- ची रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येईल.

पाळी भत्ता : तिसऱ्या पाळीतील कामगारांना रु.50/- प्रतिदिन पाळी भत्ता म्हणून देण्यात येईल.

कामगारांना कॅन्टीन मध्ये वर्तमानपत्र वाचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

    करारावरती  संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार पै.महेश लांडगे, पै.रोहिदास गाडे , संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक रघुनाथ मोरे, तेजश बीरदवडे, प्रशांतआप्पा पाडेकर, युनिट अध्यक्ष किशोर गोरखा, उपाध्यक्ष योगेश गाढवे, सरचिटणीस महेंद्र लाड, चिटणीस सुदाम गुळवे, खजिनदार राजेश सिंह, संघटक योगेश व्यवहारे, गणेश पवार तसेच व्यवस्थापनाच्या वतीने  प्लांटहेड विनोद टिपरे,  एच आर हेड गंगाधर लहाने यांनी सह्या केल्या.

      संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै.महेश लांडगे यांनी सर्व उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी प्रास्ताविक केले, व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. त्यानंतर कामगारांनी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.