वैकफिल्ड फुड्स प्रा. लिमि (Weikfield Foods Pvt Ltd) बकोरी येथे वेतनवाढ करार संपन्न

वैकफिल्ड फुड्स प्रायव्हेट लिमिटेड (Weikfield Foods Pvt Ltd) बकोरी पुणे कंपनी व्यवस्थापन व भारतीय कामगार सेना यांच्या वतीने येथील कायमस्वरूपी कामगारांसाठी पगार वाढीचा आणि अन्य सुविधांचा करार अतिशय मैत्रीपूर्ण व आनंदी वातावरणात १३ जुलै २०२१ रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :

  • कराराचा कालावधी १ जुलै २०२० ते ३१ जून २०२३ असेल 

  • एकूण पगार वाढ ७६००/- 

  • फरकाची रक्कम ही १ जुलै २०२० पासून ग्राह्य धरली जाईल 

  • हा करार कायमस्वरूपी कामगारांना एकसमान झाला

  • पगार वाढीतील ७० टक्के रक्कम ही बेसिक आणि डी.ए. मध्ये वाढविण्यात आले

  • उर्वरित ३० टक्के रक्कम ही प्रोत्साहन योजनेमध्ये इन्सेंटिव्ह म्हणून वाढवण्यात आली

  • याशिवाय मेडिक्लेम पॉलिसी मध्ये वाढ करण्यात आली तसेच टर्म इन्शुरन्स हा १५ लाख करण्यात आला

  • इतर सुविधांमध्ये ऍडव्हान्स,लंच अलाउन्स, पेट्रोल अलाउन्स, जर्किंग, सहल इत्यादीमध्ये वाढ करण्यात आली 

       सदर करार संपन्न होण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाच्या  वतीने मॅनेजिंग डायरेक्टर श्री अश्विनी मल्होत्रा, सी.ई.ओ.श्री.डी.एस.सचदेवा, जनरल मॅनेजर श्री.राम जाधव,मॅनेजर श्री.योगेश सातव, श्री राहुल गावडे, स्वाती शितोळे तसेच कामगार संघटनेच्या वतीने भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी, शिवसेना उपनेते श्री.डॉ.रघुनाथ कुचिक, युनिट पदाधिकारी नामदेव मगर, संतोष सदाशिव वारघडे, संतोष रानबा वारघडे, संजय वारघडे, बाळू वारघडे, उत्तम सातव आदींच्या उपस्थितीत करार संपन्न झाला.