नवी मुंबई : प्रोटेगो इंडिया प्रा.लिमिटेड (Protego India Private Limited) या, मुळच्या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी'त (ऑईल/गॅस/केमिकल/फार्मॅसिटीकल/वाॅटर-ट्रीटमेंट उद्योगांसाठी 'ब्रीदर-व्हाॅल्व्हज् आणि फ्लेम ॲरेस्टर'चं उत्पादन करणारी) कंपनी व्यवस्थापन आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
- कराराचा कालावधी : १ ऑगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२४
- थेट पगारवाढ रु.११,०००/- आणि जास्तीतजास्त पगारवाढ रु.१३,५००/- (सरासरी पगारवाढ रु.१२,५००/-) त्यामुळे कराराद्वारे, होणारा प्रत्यक्षात पगार (Take Home Monthly Salary) दरडोई किमान रु.६१,५००/- आणि कमाल पगार रु.६४,०००/- (सरासरी प्रत्यक्षात पगार दरमहा रु.६२,५००)
- याव्यतिरिक्त, करार-कालावधीत कंपनीची वार्षिक उलाढाल रु.६० कोटींवर गेल्यास रु.२५००/-ची अतिरिक्त वाढ कराराद्वारे प्रायोजित त्यानुसार, करारांतर्गत, एकूण संभाव्य पगारवाढ कमीतकमी रु.१३,५००/- आणि जास्तीतजास्त पगारवाढ रु.१६,०००/- (सरासरी पगारवाढ रु.१५,०००/-)
- किमान वार्षिक बोनस रु.७५,००० आणि कमाल बोनस रु.१,००,००० अधिक (एक लाख रुपये)
- पगारातील ७०% वाढ, मूळ पगार व महागाई भत्त्यात (PF-Base मध्ये) समाविष्ट, त्यामुळे, भरभक्कम भविष्यनिर्वाह निधी (PF), ग्रॅच्युईटी, बोनस रुपाने कामगार-कर्मचारीवर्गाचं निवृत्तीपश्चात फायदा
- महागाई-निर्देशांकावर आधारित बदलत्या महागाई भत्ता (Variable D.A.)
- प्रत्यक्ष काम ३९० मिनिटे (एका शिफ्टमध्ये एकूण 'साडेसहा तास' )
या वेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे, महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर यांच्यासह ‘प्रोटेगो इंडिया’ कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जवाजी, एच.आर. हेड श्वेता कदम, जनरल मॅनेजर प्रदीप रक्ताटे व प्रोडक्शन हेड उमेश पवार इत्यादी अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ज्योतिर्लिंग घोडके, संतोष देसाई, संजय पालकर, दिलीप सावर्डेकर व विजय गारगोटे हे कामगार पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा