पीएफमधून काढू शकता मेडिकल इमरजन्सीसाठी एक लाख रुपये

कोरोना महारामारीच्या काळात कारोनासह अन्य कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी तुम्ही तुमच्या ईपीएफमधून (Employees Provident Fund EPF) एक लाख रुपये आगाऊ (PF Advance) काढू शकता.

कोरोना काळात जर लोकांना अचानक पैशांची गरज भासली तर याकरता सरकारने पीएफ संदर्भात एक नवीन सेवा सुरू केली आहे. १ जून रोजी EPFO ने सर्क्यूलर जारी करत अशी माहिती दिली आहे की कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मेडिकल अ‍ॅडव्हान्स म्हणून काढता येईल. कोरोना व अन्य आजारपणांसाठी इमरजन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास पीएफमधून पैसे काढता येतील.

पीएफ मधून मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे काढण्याची पद्धत :

  • www.epfindia.gov.in वेबसाईट ओपन करा.

  • Services मध्ये - For Employees वरती क्लिक करा.

  • Member UAN/Online Service (OCS/OTCP) वरती क्लिक करा.

  • तुमचा UAN नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा. 

  • त्यानंतर ऑनलाईन सेवांवर क्लिक करून (क्लेम फॉर्म ३१- १९ १०सी आणि १० डी) वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमच्या UAN ला जोडलेल्या तुमचं बँक खातं व्हेरिफाय करू टर्म आणि कंडिशन अ‍ॅक्सेप्ट करा.

  • त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हा ऑनलाईन क्लेम हा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी असलेल्या मेडिकल इमर्जन्सी ऑप्शन सिलेक्ट करा.

  • ड्रॉप डाऊन करत PF Advance सिलेक्ट करा. (Form 31). 

  • त्यानंतर पैसे काढण्याचं कारण निवडा. तसंच तुमची अपेक्षित रक्कम सिलेक्ट करून चेकची स्कॅन कॉपी अपलोड करून आपला पत्ता टाका.

  • Get Aadhaar OTP वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी एन्टर करा. त्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल.

कोरोना काळात आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्यांसाठी सरकारने ही सेवा सुरू केली आहे. तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल तर तुम्ही या सेवेचा वापर करू शकता. आवश्यकता असल्याशिवाय पीएफमधील पैसे काढू नये.