चितळे बंधू मिठाईवाले येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : प्रसिद्ध व्यावसायिक चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale) व चितळे बंधू मिठाईवाले कर्मचारी संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला. कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कोरोना काळामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे : 

  • माहे एप्रिल २०२१ ते मार्च २०२४ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी करार अस्तित्वात राहील. 

  • प्रत्येक कामगारास रुपये ३५००/- पगार वाढ 

  • कराराच्या कालावधीमध्ये २०% बोनस

  • या पगारवाढीची ५०% रक्कम मूळ पगारात समाविष्ट करण्यात येणार

  • तीन लाखापर्यंत मेडिक्लेम सुविधा 

  • प्रत्येक कामगारास बिनव्याजी रुपये ५० हजार बिनव्याजी कर्ज 

सदर करारावर व्यवस्थापनाच्या वतीने भागीदार श्री संजय चितळे, श्री इंद्रनील चितळे, व्यवस्थापन सल्लागार अ‍ॅड. श्री अशोक गुप्ते यांनी आणि चितळे बंधू मिठाईवाले संघटना यांच्या वतीने कामगार नेते श्री रामचंद्र बी शरमाळे, संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप जगताप, जनरल सेक्रेटरी अमित सातपुते, विशाल डिंबळे, खजिनदार अरविंद मोरे, निलेश जाधव, योगेश मालपोटे, किसन दहिभाते, मयूर धुमाळ आणि युवराज धनवडे यांनी सह्या केल्या.

मागील दिड वर्षाच्या कोरोना कालावधीमध्ये व्यवस्थापनाचा फारसा धंदा नसतानादेखील या प्रतिकूल परिस्थितीमध्ये व्यवस्थापनाने सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे करार अस्तित्वात आला, त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा