राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त,महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना पुणे जिल्हा,धनकवडी विभाग आणि श्री.किशोर (बाळाभाऊ) धनकवडे नगरसेवक म.न.पा.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घरेलु महिला कामगार शासकीय नोंदणी अभियान करण्यात आले.
पुणे शहरातील घरेलु महिला कामगारांच्या शासकीय नोंदणी अभियानाची सुरुवात श्री. भगवानराव देशपांडे श्री.समर्थ मंडळ अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली या वेळी उषा जाधव जिल्हा अध्यक्ष,सुवर्णा कोंढाळकर प्रदेश चिटणीस, संध्या आदावाडे उपस्थित होत्या.
संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात घरेलु महिला कामगार शासकीय नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. पुणे येथे धनकवडी भागातील नोदणी अभियानाची सुरुवात श्री.किशोर ( बाळाभाऊ) धनकवडे नगरसेवक पुणे म.न.पा, सौ.धनकवडे वहिनी, सौ.मिना पंडित, प्रदेश उपाध्यक्ष म.अ.का. संघटना यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी नसरीन शेख, सुनीता बढे, यशोदा साळवे, वनिता ईवारे या संघटना पदाधिकारी उपस्थित होत्या.
कामगार महिला नोंदणी साठी सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होत्या, अशी माहिती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस श्री.शरद पंडित यांनी दिली आहे.
नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी श्री जयनाथ मित्र मंडळ कार्यकर्ते धनकवडी गाव तसेच पुणे शहर व धनकवडी भागातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.