चाकण : महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लिमिटेड (Mahindra CIE Automotive Ltd) ही स्पेनच्या सीआयई ऑटोमॅटिव्ह कंपनी आंबेठाण चाकण येथे आहे. कंपनीच्या अत्याधुनिक कारखान्यात वाहनासाठी लागणाऱ्या कॅन्कशाफ्ट आणि नकल व सत्संग सुट्या भागाचे उत्पादन करण्यात येते, या सुट्ट्या भागासाठी कंपनी या क्षेत्रात मार्कट लीडर आहे.
कार्पोरेट सोशल रेस्पोंसि रिसपॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार कंपनीमार्फत कारखान्याच्या परिसरातील पर्यावरण, आरोग्य व शैक्षणिक, सामाजिक उपक्रम कारखान्याच्या परिसरातील ग्रामस्थांच्या फायद्यासाठी राबविण्यात येत आहेत.
कंपनीच्या सीएसआर निधीतून पंचायत समिती खेड, तालुका आरोग्य विभाग खेड व ग्रामपंचायत यांच्या विनंतीवरून भविष्यात येऊ घातलेल्या covid-19 च्या तिसऱ्या लाटेचा विचार करून व सध्याची असलेली गरज लक्षात घेऊन २० फाऊलर बेडचे वाटप दिनांक २२ जून २०२१ रोजी कंपनीचे श्री सुनील नरके चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, श्री अजय जोशी पंचायत समिती खेड व श्री बळीराम गाढवे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या शुभहस्ते म्हाळुंगे कोविड सेंटर येथे करण्यात आले.
यावेळी श्री देवेंद्र अकोलकर हेड मनुष्यबळ विभाग यांनी कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उत्तरदायित्व योजनांचा लेखाजोखा मांडून सदैव कंपनी समाजातील गरजू घटकांनाकरिता तत्पर असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी श्री बळीराम गाढवे यांनी कोरोनाच्या येवू घातलेल्या संभाव्य तिसऱ्या लाटे संदर्भात प्रशासन कशा पद्धतीने तयारी करत असून म्हाळुंगे येथील कोविड सेंटर हे समाजातील सर्व घटकांना कशा पद्धतीने उपयुक्त आहे व या सर्व सोयीयुक्त कोविड सेंटरचा जवळील गावकर्यांना, विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व गरजू मजूर कामगार वर्ग यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री अजय जोशी पंचायत खेड यांनी कंपनीचे श्री सुनील नरके चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व व्यवस्थापनाचे आभार मानले व भविष्यात अशा योजनांचा लाभ समाजातील गरजू घटकांनी अधिक पद्धतीने कसा करता येईल व प्रशासनाच्या माध्यमातून व विविध कंपन्यांच्या सहकार्यातून अशा वेळी प्रकारचे उपक्रम राबवून या कोरोना सारख्या जागतिक महामारीतून समाजातील गरजू घटकांना पंचायत समिती खेड राबवित असलेले विविध उपक्रम व चाकण मधील विविध कंपन्या व्यवस्थापनास अशा स्वरूपाचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत सहभागाच्या दृष्टीने विनंती केली.
या कार्यक्रमास श्री संतोष म्हाळुंगकर अध्यक्ष कामगार संघटना, श्री लक्ष्मण लिबापुरे जनरल सेक्रेटरी, अनिल काला, सौ संघमित्रा नायकनवरे सरपंच आंबेठाण, सौ मयुरीताई म्हाळुंगकर सरपंच म्हाळुंगे, श्री उगले ग्रामविकास अधिकारी आंबेठाण, श्री परासुर ग्रामसेवक, डॉ. रॉली म्हात्रे तसेच म्हाळुंगे गावचे उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे सिनियर मॅनेजर श्री नवनाथ सूर्यवंशी यांनी केले या उपक्रमाचे म्हाळुंगे व आंबेठाण ग्रामस्थांनी कौतुक करण्यात केले.