रांजणगाव एमआयडीसी : 3A कॉम्पोसिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (3A Composites India Pvt Ltd) व 3A कॉम्पोसिट्स इंडिया कामगार संघटना यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
- सदर करार तीन वर्षाचा आहे (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४) या
- तीन वर्षासाठी रु.१२,५००/- पगारवाढ
दुसरे वर्ष = रु.३५००/-
तिसरे वर्ष = रु.५५००/-
- पगारवाढीतील ४०% रक्कम मूळ पगारामध्ये समाविष्ठ करण्यात आली.
यावेळी करारावर कंपनी व्यवस्थापन वतीने अमोल परदेशी (मॅनेजर प्लांट ऑपरेशन),महेश राठोड (मॅनेजर,एचआर) आणि संघटनेच्या वतीने कामगार नेते रामचंद्र शरमाळे, संघटनेचे अध्यक्ष अशोक देशमुख, अमरनाथ धुमाळ, गणेश धुमाळ, राजेंद्र ठोणगे, विशाल शेळके आणि संदीप घेगाडे यांनी सह्या केल्या.
कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये प्रदीर्घकाळ चर्चा होऊन सन्माननीय तडजोड करार अस्तित्वात आला. कोरोना काळामध्ये उभयपक्षांनी समंजसपणाची भूमिका घेऊन करार करण्यात आला त्यामध्ये त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा