कोविड-१९ महामारी दरम्यान वैद्यकीय सेवा आणि दिलासा देण्यासाठी राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) विविध लाभ

ESIC reaches out to its Beneficiaries to provide medical care and relief during Covid-19 pandemic

राज्य कर्मचारी विमा महामंडळाची कोविड-१९ महामारी दरम्यान विविध लाभ :

वैद्यकीय लाभ

  • कोविड-१९ ने संक्रमित असलेल्या परिस्थितीत  विमाधारक व्यक्ती आणि / किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोविड-१९ समर्पित घोषित केलेल्या कोणत्याही ईएसआयसी अर्थात राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या / ईएसआयएस अर्थात राज्य सरकारांद्वारा संचालित रुग्णालयात विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळू शकते. सद्यस्थितीत, ईएसआयसी कडून प्रत्यक्ष संचालित २१  ईएसआयसी रुग्णालयांमध्ये ३६७६ कोविड अलगीकरण खाटा, अतिदक्षता विभागातील २२९ खाटा आणि व्हेंटिलेटर असलेल्या १६३ खाटा तसेच राज्य सरकारांद्वारा संचालित कोविड-१९ समर्पित २६ ईएसआय योजना रुग्णालयांमध्ये  २०२३ खाटा कार्यान्वित आहेत.

  • वरील व्यतिरिक्त, ईएसआयसी रुग्णालयातील खाटांच्या क्षमतेच्या  किमान 20% खाटांसह  ईएसआय विमाधारक व्यक्ती ,लाभार्थी, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी समर्पित कोविड खाटा  कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • गंभीर कोविड-१९ रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आश्वासक परिणाम देणारी प्लाझ्मा थेरपी ईएसआयसी वैद्यकीय  महाविद्यालय आणि रुग्णालय ,फरीदाबाद (हरियाणा) आणि ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय , सनथ नगर (तेलंगणा) येथे उपलब्ध आहे.

  • ईएसआय लाभार्थी त्याच्या / तिच्या हक्कानुसार थेट संदर्भ पत्र न घेता संलग्न रुग्णालयातून आपत्कालीन / विना आपत्कालीन-वैद्यकीय उपचार घेऊ शकतात.

  • कोविड -१९ ने  संक्रमित  विमाधारक  किंवा कुटुंबातील सदस्याने  कोणत्याही खाजगी संस्थेत उपचार घेतल्यास खर्चाच्या प्रतिपूर्तीचा दावा केला जाऊ शकतो.

रोख लाभ

  • कोविड -१९ ने संक्रमित झाल्यामुळे  विमाधारक  आपल्या कार्यस्थळी उपस्थित राहू शकत नसेल तर तो आपल्या पात्रतेच्या अनुरूप अनुपस्थितीच्या काळात आजारपणाच्या लाभाचा दावा करू शकतात .आजारपणाचा लाभ सरासरी दैनंदिन  मजुरीच्या ७०% दराने ९१ दिवसांसाठी दिला जातो.

  • जर कोणी विमाधारक व्यक्ती बेरोजगार झाली तर त्या व्यक्तीला अटल विमा कल्याण योजना (एबीवीकेवाई) अंतर्गत अधिकाधिक ९० दिवसांसाठी दैनंदिन सरासरीच्या ५०% दरापर्यंत दिलासा मिळू शकतो. हा लाभ घेण्यासाठी विमाधारक व्यक्ती आपला दावा www.esic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करू शकतात.

  • जर कोणी विमाधारक व्यक्ती आयडी कायदा , १९४७ नुसार कारखाना / आस्थापना बंद झाल्यामुळे बेरोजगार झाल्यास, तो व्यक्ती पात्रतेच्या अधीन राहून आरजीएसकेवाई के अंतर्गत २ वर्षाच्या कालावधीसाठी बेरोजगारी भत्त्याचा दावा करू शकतो. 

  • अंत्यविधीचा खर्च म्हणून देण्यात येतो.कोणत्याही विमाधारकाचे दुर्दैवी निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबीयातील त्या व्यक्तीच्या ज्येष्ठ जीवित सदस्याला रु.१५,०००/-  
सविस्तर माहिती साठी खालील image वरती क्लिक करा.