EPFO लवकरच २०२०-२१ च्या व्याजदराबाबत घोषणा करणार

EPFO will soon announce interest rates for 2020-21

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) कडून २०२०-२१ वर्षासाठी व्याज दराची घोषणा मार्च महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची पुढील बैठक ४ मार्चला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्या बैठकीत २०२०-२१ वर्षासाठी व्याज दराची घोषणा केली जाऊ शकते. ईपीएफओकडून सीबीटी सदस्यांच्या बैठकीचा अजेंडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचं म्हटलंय. (EPFO to announce pf interest rates for 2020-21 in March) अशी माहिती टीव्ही ९ वृत्तसंस्थेने दिली आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खातेदारांना द्यायच्या व्याज दराबाबत चर्चा होऊ शकते.

ईपीएफओचे जवळपास 6 कोटी ग्राहक आहेत. त्यांच्या खात्यामध्ये व्याज जमा केले जाते. २०१९-२० मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून ८.५ टक्के व्याज दर दिला होता. गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी व्याज दर होता. २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के व्याज देण्यात आले होते.