पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून नव्यानेच ऑनलाईन सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी आपले रु. १२/- कंपनीत कपात केले आहेत त्यांना कंपनीकडून LIN नंबर मिळाला असेलच. तो कामगारांना त्यांच्या मोबाइलवर पाठविला गेला असेल. हा LIN नंबर यापुढे मंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यास अत्यंत आवश्यक असणार आहे. करिता आपण लवकरात लवकर आपला LIN नंबर उपलब्ध करुन घ्यावा. कंपनीकडे तशी मागणी करावी.
सदर LIN नंबर हा ऑनलाईन प्रक्रियेत कामगाराचा आयडी म्हणून तर ज्यावर लिन नंबर आला आहे तोच मोबाइल नंबर हा पासवर्ड असणार आहे. सर्व कामगारांनी LIN नंबर मिळवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे मागणी करावी.
