चाकण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र चाकण लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियन आणि लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्सवात पार पडले. कंपनी आवारातील संघटना सभासद त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारी आणि व्यवस्थापन वर्ग यांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रक्तदान केले.
जवळपास २७० जणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला परंतु हिमोग्लोबीन आणि इतर काही आरोग्यविषयक कारणास्तव रिजेक्ट झालेले इच्छुक सोडून एकूण १८० रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे, कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य माननीय श्री रविराज इळवे, मा. श्री. दत्तात्रय येळवंडे कार्याध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, सौ. सुजाता रविराज इळवे,श्री. मनोज पाटील प्र. सहा. कल्याण आयुक्त, त्याच प्रमाणे लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मा. श़्री. अमित गर्ग प्ला़ट हेड, मा. श्री. संतोष कदम, एच आर हेड व्यवस्थापक, मा. श्री.वेंडेल वेस्ली एच. आर.मॅनेजर, श्री.संजय थोरात अधिक्षक पुणे,लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष श्री अविनाश वाडेकर, जनरल सेक्रेटरी श्री गणेश बोचरे, खजिनदार श्री रवी साबळे, उपाध्यक्ष श्री नीलेश पाटोळे, कार्याध्यक्ष श्री कमलेश गावडे, आणि रूपाली शिंदे, मुकुंद म्हाळुंगकर, श्रद्धा सरकार, अंकुश ताठे, किशोर दाभाडे, गणेश आरुडे आणि सर्व संघटना सभासद उपस्थित होते.
सदर प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कल्याण आयुक्त माननीय श्री रविराज इळवे यांनी कार्यक्रम आयोजकांचे अभिनंदन केले आणि लॉरियाल व्यवस्थापन आणि संघटना यांच्यामधील नातेसंबंधांचे कौतुक केले तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनाची माहिती दिली. तद्नंतर मा. इळवे, कल्याण आयुक्त मा.वेस्ली एच आर यांच्याहस्ते कंपनी आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक रक्तदाता आणि त्याच्या कुटुंबातील दोन प्रौढ व्यक्ती यांचा प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे एकूण पंधरा लाखांचा अपघाता विमा काढण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रस़चालन अविनाश राऊत केंद्र संचालक चाकण या़नी केले सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियन प्रतिनिधी, एच आर प्रतिनिधी व व्यवस्थापन वर्ग यांनी परिश्रम घेतले. संघटनेच्या वतीने रवी साबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.