पुणे : जेजुरी एम.आय.डी.सी.येथील कोनेक्रेन्स अँड डिमॅग प्रायव्हेट लिमिटेड (Konecranes And Demag Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि डब्ल्यू. एम.आय. कोणीक्रेन्स कामगार संघटना यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :-
करार कालावधी : सदर हा करार दिनांक 1 जुलै 2022 ते 30 जून 2025 अशा तीन वर्षाकरिता करण्यात आला.
पहिल्या वर्षासाठी:- 5800/-
दुसऱ्या वर्षासाठी 4350/-
तिसऱ्या वर्षासाठी 4350/-
फरकाची रक्कम :- 100% फरकाची रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले त्यामध्ये बोनस ओव्हर टाईम चा फरक ही देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले.तसेच फरकाची रक्कम एप्रिल महिन्याच्या पगारात वन टाइम देण्याचे मान्य करण्यात आले
मेडिक्लेम सुविधा :- मागील करारामध्ये (1+3) चा प्रीमियम कंपनी भरत होती त्याचे कव्हरेज रु.1.5 लाख होते, सदरच्या करारानुसार कामगार स्वत: + पत्नी दोन मुले व आई-वडिलांना नव्याने ऍड करण्यात आले आहे. सदरच्या पॉलिसीचा कव्हरेज 1.5 लाख ठेवण्यात आलेला आहे.
फॅमिली फंक्शन :- नव्याने दरवर्षी फॅमिली डे आयोजित करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे.
हाईट अलाउन्स :- मागील करारामध्ये साइटवर काम करताना प्रतिदिन रुपये 300/- याप्रमाणे हाईट अलाउन्स होता सदरच्या करारामध्ये रुपये 200 /- वाढवून देण्याचे मान्य करण्यात आले त्यानुसार हाईट अलाउन्स रुपये 500/- मान्य करण्यात आला.
री लोकेशन अलाउन्स :- कायम कामगारांपैकी एक कामगार वर्षातून एकदा एक महिन्यासाठी आवश्यकता असेल तेव्हा साइटवर कामासाठी जाईल जर त्या कामगारास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी साईडवर कामासाठी जावे लागले तर त्याला 17500 /- रुपये लोकेशन अलाउन्स म्हणून प्रतिमाह देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले आहे तसेच सध्या साइटवर गेल्यावर मिळणाऱ्या सेवा व सुविधा आहे तसेच चालू राहतील असे मान्य करण्यात आले आहे.
बोनस :- सध्या प्रॅक्टिस मध्ये असलेली बेसिक डीएच्या 8.33% ही बोनसची प्रथा आहे तशी चालू राहील.
स्पोर्ट :- सदरच्या करारात दरवर्षी स्पोर्ट इव्हेंट आयोजित करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे.
मागील सेवा सुविधा जसेच्या तसे पुढे सुरू राहणार आहेत .
करारा वरती व्यवस्थापनाच्या वतीने श्री तौसीब कागड (मॅनेजिंग डायरेक्टर), सुमित कदम (एच आर डायरेक्टर), ओम प्रकाश सिंग (डायरेक्टर आय एस इ ऑपरेशन), लीना वाडेकर (फायनान्स डायरेक्टर), श्रीमती मीनल जठार (कॉर्पोरेट सेक्रेटरी अँड लीगल हेड), श्री गणेश आहेर (फॅक्टरी एच आर हेड.) तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री तानाजी दराडे, जनरल सेक्रेटरी राहुल बांदल, खजिनदार श्री अमोल घाडगे, सहसचिव श्री स्वप्निल कानसे, सदस्य काकासाहेब गायकवाड, सदस्य संपत पोंदकुले यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
सदर करार यशस्वी करण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार श्री अरविंद श्रुती, संघटनेचे सल्लागार पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी महापौर, किमान वेतन सल्लागार महाराष्ट्र राज्य समिती सदस्य, श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार श्री केशवजी घोळवे, श्रमिक एकता महासंघाचे माजी अध्यक्ष व सल्लागार दिलीपरावजी पवार, श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार श्री मारुतीराव जगदाळे, श्रमिक एकता महासंघाचे विद्यमान अध्यक्ष श्री किशोरजी सोमवंशी या सर्वांचे वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य व मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.
वेतन वाढ करार हा कोणी क्रेन व्यवस्थापन व डब्ल्यू एम आय कोणी क्रेन्स कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर संघटनेच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघ हितासाठी असणारी तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य गुणवत्ता सुरक्षा शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे करार यशस्वीरित्या पूर्ण झाला अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.