पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी मधील सीआयई ॲटोमोटीव्ह इंडिया लि.भोसरी (CIE Automotive India Ltd) येथे सीआयई कंपनी व्यवस्थापन व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना यांच्यामध्ये तिसरा वेतन करार शांततामय आणि खेळीमेळीच्या वातावरणात मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी श्रमसाफल्य भवन खंडाळा येथील संघनेच्या कार्यालयात अंतिम स्वाक्षरीचा कार्यक्रम शांततामय व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
वेतनवाढ करारातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :-
कराराचा कालावधी : दि. 01ऑगस्ट 2023 ते 31 जुलै 2027
फिक्स वाढ :- ₹10600/- CTC
व्हेरीएबल वाढ :- ₹1000/-
वेतनवाढ (तीन टप्यात) पुढील प्रमाणे :-
पहिली वेतनवाढ टप्पा - 16 महिने 60% रु. 6960/- दि. 01ऑगस्ट 2023 पासून लागू.
दुसरी वेतनवाढ टप्पा :- 16 महिने 20% रु. 2320/- दि. 01 डिसेंबर 2024 पासून लागू.
एकुण 80% वाढ ₹9280/-
तिसरी वेतनवाढ टप्पा - 16महिने 20% रु. 2320/- दि. 01 एप्रिल 2026 पासून लागू.
एकुण 100% वाढ ₹11600/-
फरक (Arears) : दि.01ऑगस्ट 2023 ते 31 डिसेंबर 2024 या सतरा महिन्याचा एकरकमी फरक माहे जानेवारी 2025 च्या पगाराबरोबर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
दिवाळी बोनस : उत्पादनाशी निगडीत बोनस करार न करता प्रचलित पद्धती नुसार बोनस देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
पेड हाॅलीडे : पेड हाॅलीडे मध्ये एक ने वाढ करून 7 ऐवजी 8 पेड हाॅलीडे देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
मेडीक्लेम पॉलिसी : मेडीक्लेम पॉलिसीमध्ये 50,000 ने वाढ करून 15,0000/- (एक लाख पन्नास हजार) रू पाॅलीसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
बफर पाॅलीसी : बफर पाॅलीसी प्रती वर्ष 5,00,000 (पाच लाख) देण्यात येणार आहे.
टी शर्ट (T Shirt) : सर्व कायम कामगारांना प्रतीवर्ष कंपनी लोगो असलेला टी शर्ट देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.
व्हेरीएबल पे : व्हेरीएबलसाठी पाठीमागील करारामध्ये 22% रक्कम लावली होती ती टक्केवारी कमी करून या नविन करारातील ₹1000 ही रक्कम साधारणपणे MGLPP ₹500 (4%) व QIPP ₹ 500 (4%) या दोन्ही बाजूला पाठीमागील 4 वर्षाची सरासरी काढून त्याचा बेस ठरवून पाठीमागील करारातील मिळणा-या रकमेला हात न लावता त्याच्यावर लावलेली आहे.
सुविधा (Facilities) : नविन करारात दिलेल्या सर्व सुविधा (फॅसिलीटी) ह्या CTC व्यतिरिक्त असून पाठीमागे मिळत असलेल्या सर्व सुविधा (फॅसिलीटी) कायम पुढे चालू ठेवण्यात येणार आहेत.
सदर करार संपन्न होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आमदार श्री. सचिन अहिर (अध्यक्ष ),श्री. संजय कदम (उपाध्यक्ष) तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले.
हा वेतनवाढ करार करण्यासाठी सीआयई व्यवस्थापनातर्फे श्री.राहुल देसाई (CEO), श्री.विनायक कडसकर (HR Head), श्री.रविंद्र वैद्य (HR General Manager). श्री.अनिल खेडकर (Plant Head), श्री.बाळासाहेब पाटील (Sr.HR Manager), श्री.संतोष चिकाटे ( DY HR Manager) तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे आमदार श्री.सचिन अहीर (अध्यक्ष), श्री. संजय कदम (उपाध्यक्ष), श्री.दत्तात्रय धावडे (युनिट अध्यक्ष), श्री.सुभाष जमादार (युनिट उपाध्यक्ष), श्री.ज्ञानेश्वर कळमकर (युनिट जनरल सेक्रेटरी), श्री.दिपक अरगडे (युनिट सेक्रेटरी), श्री.कृष्णदेव थोरात (खजिनदार) यांनी सह्या केल्या.
व्यवस्थापनाची सामंजस्याची भुमिका आणि सकारात्मक दृष्टीकोन आणि संघटनेच्या सभासदांनी राखलेला संयम, अभेद्य एकजुट, केलेले मोलाचे सहकार्य, संघटना आणि संघटनेतील प्रतिनिधींवर ठेवलेला विश्वास यांच्या बळावर हा करार यशस्वीरित्या संपन्न झाला. कराराची घोषणा झाल्यानंतर युनियन प्रतिनिधींनी सर्व कामगारांचे आभार मानले.