पुणे : रोची इंजिनियर्स प्रा.लि.पिरंगुट,ता.मुळशी जि.पुणे कंपनी व्यवस्थापनाने मा.औद्योगिक न्यायालय पुणे यांचे अंतरिम आदेशाचा अवमान करून स्थानिक भूमिपुत्र कायम स्वरुपी ६३ कामगारांना दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी पासून बेकायदेशीरपणे कामावर येण्यास प्रतिबंधीत केले असल्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यालय बावधन पुणे येथे शिवसेना उपनेते,भारतीय कामगार सेना सरचिटणीस डॉ.रघुनाथजी कुचिक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपूत्र कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
कामगारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
१) मे. रोची इंजिनिअर्स प्रा.लि., कंपनीचे सर्वश्री मुख्य मालक व व्यवस्थापनाने दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी पासून बेकायदेशीररित्या कामावर येण्यास प्रतिबंध केलेल्या सर्व कायम कामगारांना त्यांच्या संपूर्ण सेवा सलगतेसह कामावर, नोकरीत रूजू करून घ्यावे.
2) मा. औद्योगिक न्यायालय, स्वारगेट, पुणे यांचे दि.२२ फेब्रुवारी २०२४ व ०१ ऑक्टोबर २०२४ रोजीचे आदेशानुसार शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कामगारांना नोकरीतून रिट्रेचमेंट, कमी करू नये असे हुकूम, आदेश कंपनी व्यवस्थापनाला केलेले असल्यामुळे त्या हुकूम आदेशाचे पालन करण्यात यावे.
३) दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी पासून बेकायदेशीररित्या कामावर येण्यास प्रतिबंध केलेल्या सर्व कामगारांना मधल्या काळातील संपूर्ण वेतन देण्याची व्यवस्था कंपनी व्यवस्थापनाने करावी.
४) सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून तथा माणूसकीच्या नात्याने कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या या प्रश्नाकडे पाहून मा. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचे, हुकूमाचे त्वरीत पालन करावे व सर्व संबंधित कायम कामगारांना त्वरीत कामावर रुजू करून घ्यावे.