महिंद्रा अँड महिंद्रा - इंजिन प्लांट, निघोजे येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

चाकण - दिनांक १५-नोव्हेंबर- २०२४ रोजी, महिंद्रा अँड महिंद्रा इंजिन प्लांट, निघोजे आणि यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, ब्लड सेंटर, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन हे करण्यात आले होते,   या रक्तदान शिबराला अधिकारी,  असोसिएट्स व कर्मचारीवृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री. संजय क्षिरसागर प्लांट हेड यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर यशस्वीरिता संपन्न झाले.

     यावेळी सर्वांना संबोधीत करताना त्यांनी महिंद्र समूह हा सामाजिक बांधीलकी प्रति विविध उपक्रमामध्ये कशा पद्धतीने सहभाग घेत असतो तसेच आरोग्य, शिक्षण व पर्यावरण यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच रक्तदानासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तास कोणत्याही प्रकारचा पर्याय हा आज उपलब्ध नसून आपण आपल्या देशातील रक्ताची भासणारा तुटवडा हा कमी करण्यास एक प्रकारे मदतच केली पाहिजे व सर्वश्रेष्ठ दान करण्यात सदैव आपण योगदान दिले पाहिजे 'हि भूमिका त्यांनी मांडली.  

     इआर विभागाचे प्रमुख श्री बबीत नायक यांनी शिबिराचे प्रास्ताविक करतेवेळी रक्ताची असलेली उणीव व त्यासाठीच्या महिंद्रा व्यवस्थापनातर्फे घेण्यात आलेला उपक्रम यशस्वी करण्याकरता सर्वांना शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या भविष्यकाळात अशा प्रकारची विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने कटीबद्ध असल्याचे सांगितले, तसेच असोसिएट्स संघटनेचे युनिट अध्यक्ष श्री अजय घाडगे यांनी रक्तदात्यांशी संभाषण साधतेवेळी आपले रक्तदान अनेकांचे प्राण वाचवू शकते हे सांगून सर्वांनी अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजासाठी योगदान द्यावे हि विनंती केली. संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री रविराज कदम यांनी रक्तदान हि समाजाची सेवा करण्याची आपल्यासाठी एक संधी आहे' हे मत मांडले.

    या शिबिराचे आयोजन हे महिंद्रा अँड महिंद्रा इंजिन प्लांट, निघोजे येथील प्रशासकीय इमारतीत करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी राक्तदात्यांसाठी विशेष प्रमाणपत्र देण्यात आले या शिबिरामध्ये १०७ जणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला, परंतु हिमोग्लोबिन आणि इतर कारणांमुळे जवळ जवळ २३ जण रक्तदान करू शकले नाहीत म्हणजे प्रत्यक्ष ८४ रक्तदात्यांचे रक्तदान झाले. वाय सी एम हॉस्पिटल ब्लड सेंटर यांच्यावतीने महिंद्र व्यवस्थापनास या कार्यक्रमाची पोहोच म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. नागेश जोशी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

    कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने, डॉ. चंचल, नवनाथ सूर्यवंशी, राजकुमार पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष आकाश गव्हाणे, आशिष खुरपडे, बळीराम चव्हाण, गोकुळ जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली या वेळी कंपनी व्यवस्थापनाचे पदाधिकारी हेमंत चव्हाण, कुमार सत्यसाई, गौरव दांडेकर , डॉ. मेघना सावनेर, अमित पाटील, श्रद्धा यादव, शुभम पठूळे व संतोष वरपे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले.