चाकण : येथील औद्योगिक नगरीतील टेनेको क्लीन एअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Tenneco Clean Air India Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि टेनेको एम्प्लॉईज युनियन चाकण यांच्यामध्ये पाचवा वेतनवाढीचा करार, शांततामय उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे -
कराराचा कालावधी : दि.01/01/2023 ते दि.31/12/2025(तीन वर्ष) असा राहील.
दि.01/01/2023 ते दि. 31/12/2023 - रु.6000/-
दि.01/01/2024 ते दि.31/12/2024 - रु.7000/-
दि.01/01/2025 ते दि.31/12/2025 - रु.7000/-
करार फरक रक्कम : जानेवारी 2023 ते सप्टेंबर 2023 या नऊ महिन्याचा फरक एकरकमी देण्यात येईल.
सन 2023 - रु.35,600/-
सन 2024 - रु.37,600/-
सन 2025 - रु.38,600/-
पाडवा पुजा गिप्ट : रु.20,000/ - या रकमेत वाढ करून रु.22,000/ - प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यात देण्यात येईल.
रात्रपाळी भत्ता : यामध्ये वाढ करून रु.75/- वरून रु.100/- प्रति दिन एवढी करण्यात आली आहे.
मेडीक्लेम पॉलिसी : पूर्वीच्या रुपये दिड लाख मध्ये वाढ करून रु.दोन लाख पॉलीसी तसेच पंधरा लाख रु बफर . स्वत:,आई- वडील, पत्नी व दोन मुले
जर्कीग व टि शर्ट : दर वर्षाला एक टि शर्ट , तसेच कराराच्या मधल्या वर्षाला एक जर्कींग देण्यात येईल.
मेडीकल चेक अप : सध्या करत असलेल्या मेडीकल चेकअप मधे कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात येईल.
कॅन्टीन : दररोज जेवणामधे ग्रीन सलॅड देण्यात येईल, पेड काउंटर वर अंडी देण्यात येतील, तिसऱ्या पाळीत नाष्टा - 150 ML दूध, 100gm बिस्कीट, हलदीराम पॅकेट
दसरा दिवाळी स्वीट : दसऱ्याला 1 किलो मिठाई तसेच दिवाळीला 1 किलो ड्रायफ्रुट देण्यात येईल.
सदर करार करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने दिगंबर पारखे (ऑपरेशन डायरेक्टर), संजय आव्हाळे (प्लॅन्ट हेड), मारी मुथ्थू (सिनियर एच.आर. मॅनेजर), तुषार पवार (एच.आर. मॅनेजर) तसेच युनियनच्या वतीने तात्यासो भोसले (अध्यक्ष), सुनिल मुदगूडे (जनरल सेक्रेटरी), संदिप दरेकर (उप. अध्यक्ष), संदिप पवार (उप.अध्यक्ष), सत्यवान पानसरे (सह.सेक्रेटरी), संपत जाधव (सह सेक्रेटरी), गणेश गुंजाळ (खजिनदार) यांनी स्वाक्षरी केली.
सदर करार संपन्न होण्यासाठी मार्गदर्शन श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुतीराव जगदाळे, श्रमिक एकता महासंघ (SEM), महासंघाचे सल्लागार, कामगार चळवळीसाठी आणि कामगारांच्या हितासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले. संघटनेच्या सर्व सभासदांनी राखलेल्या संयम, अभेद्य एकजूट, केलेले सहकार्य, संघटना आणि संघटनेतील प्रतिनिधीच्यावर ठेवलेला विश्वास यांच्या बळावर हा करार यशस्वीरित्या संपन्न झाला अशी माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली.