सॅन्डविक कंपनी (Sandvik Company) येथे वेतनवाढ करारसंपन्न

पुणे : दापोडी येथील सॅन्डविक कंपनी (Sandvik Company) व्यवस्थापन आणि सॅन्डविक एशिया एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये दिनांक १७/१०/२०२३ रोजी  वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे -

करार कालावधी : कराराचा कालावधी हा 4.5 वर्षाचा असेल (दि.1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2026)

कराराचे सर्व आकडे हे 10 वर्ष सरासरी सर्व्हिस धरून कॅल्क्युलेट केले आहेत

इसेंटीव्ह चे  2 वेगवेगळे असणारे  करार जे 31 ऑक्टोबर 2022  ला संपणार होते ते 1जुलै 2022 पासून लागू होणाऱ्या wage settlement मध्ये समाविष्ट केले आहेत

सदर incentive कररातून रुपये 3000 इतकी रक्कम पगारात फंक्शन आलाऊन्स मध्ये समाविष्ट केली आहे तसेच Incentive base च्या वर जी कमाई केली  गेली आहे ती सुद्धा पगारात समाविष्ट केली आहे

सदर कमाई सरासरी रुपये 1500/-  इतकी आहे

पगारवाढ आणि इंसेंटीव्ह हे खालील प्रमाणे पगारात असतील

पगारवाढ : 

पहिला टप्पा - जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 ( कालावधी सहा महिने)
पगारवाढ - 8339/-, VBPLS INCENT.  4603/-, KPI INCENTIVE.  3069/-, Function 1            3000/-, Function 2  1500/-
Total : 20510/-

दुसरा टप्पा - 1 जानेवारी 2023 ते ३१ डिसेंबर २०२३ (कालावधी 1 वर्ष)
पगार वाढ - रु. 5559/-
एकूण - रु. 5559/-

तिसरा टप्पा - 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 (कालावधी 1 वर्ष)
पगार वाढ - रु. 5559/-
एकूण - रु. 5559/-

चौथा टप्पा - 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 (कालावधी 1 वर्ष)
पगार वाढ - रु. 4169/-, Incentive 1 - रु.812/-, Incentive 2  - रु.542/-
एकूण - रु. 5523/-

पाचवा टप्पा - 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 (कालावधी 1 वर्ष)
पगार वाढ - रु. 4169/-
एकूण - रु. 4169/-

सर्व टप्पे मिळून एकूण वाढ - रु. 41320/-

याव्यतिरिक्त वार्षिक इंसेंटिव्ह मध्ये  महिना हजार रुपया प्रमाणे 12000 रुपयांची वाढ होऊन  वार्षिक इंसेंटिव्ह हा रु.75000/- इतका झाला आहे.

पूर्ण पगार वाढ - 41320 +1000 = 42320/-

10 वर्ष सर्व्हिस असणाऱ्यांना पगार वाढीत प्रति वर्ष 100 रुपया प्रमाणे 10 वर्षाचे  ₹ 1000/- सर्व्हिस इनक्रिमेंटचे समाविष्ट आहेत
5 टप्प्यात -
10 वर्ष  - 1000/-
11 वर्ष - 1100/-
12 वर्ष - 1200/-
13वर्ष  - 1300/-
14 वर्ष - 1400/-
असे समाविष्ट आहेत. हे सर्व धरून संपूर्ण पगारवाढ रु.42320/- इतकी 10 वर्ष  सर्व्हिस असणाऱ्या कामगारांना मिळणार आहे

25 वर्ष सर्व्हिस असणाऱ्यांना सर्व्हिस इनक्रिमेंट चे 5 टप्प्यातले  ₹ 7500/- वरील रकमेत ऍड होऊन रु.49820/- व 35 वर्ष सर्व्हिस असणाऱ्याना ₹12500/- वरील रकमेत ऍड होऊन रु.54820/- इतकी रक्कम  पगार वाढ 4.5 वर्षात होणार आहे

10 वर्ष - रु.42320/-
25 वर्ष  - रु.49820/- 
35 वर्ष - रु.54820/-

याव्यतिरिक्त वार्षिक अटेंडन्स स्किम मध्ये सरासरी  वार्षिक अटेंडन्स रु. 15000/- ते 17000/-  इतका मिळायचा आता तो सरासरी वर न काढता वैयक्तिक कामगारांच्या प्रति दिवस पगार गुणिले 12 महीने या प्रमाणात मोजला जाईल आणि दिला जाईल. उदाहरण - कामगार ज्यांचे दिवसाचे वेतन 3000 आहे. अश्याना 3000* 12 =36000/-

रिटायरमेन्ट : कंपनी त काम करणाऱ्या सर्व एम्प्लॉईज ची रिटायरमेंट ही प्रचलित प्रथेप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या 1 दिवस न होता महिन्याच्या शेवटच्या दिवशी होईल

मागील करारातील सर्व अटी आणि शर्ती जश्याच्या तश्याच लागू असतील

16 महिन्याचा फरक एकरकमी नोव्हेंबर 2023 च्या पगारात मिळणार आहे.

    व्यवस्थापनाच्या वतीने करारावर सुरेंद्र कुमार, प्रेसिडेंट सॅन्डविक कोरोमांट, अमूर्त बेटोले साहेब व्हाईस प्रेसिडेंट हर, हेमंत नाडगौडा, अभिजित हडप, निरंजन रेम्भोटकर, मिलिंद पानगावकर, संजय बोन्द्रे, संतोष जैस्वाल, सागर शिंदे यांनी तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष संतोष कणसे, जनरल सेक्रेटरी नितीन पवार, उपाध्यक्ष आकाश साळुंखे, खजिनदार मोहित शिवरकर, जॉईंट सेक्रेटरी सुचेतन नलावडे यांनी सह्या केल्या.

    करार यशस्वी करण्यासाठी सर्व  सभासदांनी भक्कम साथ दिली आणि संयम राखला, सॅन्डविक संघटनेचे माजी अध्यक्ष मारुती जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन सदर करार करताना लाभलेअसे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.